जळगांव – पिंप्री येथील श्री कुलस्वामिनी चामुंडा माता प्राणप्रतिष्ठा सोहळा
धरणगाव – आपणास कळविण्यात आनंद होतो , की, पिंप्री खुर्द येथील श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. आपण आवर्जून कुलस्वामिनीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहुन शोभा वाढवावी ही नम्र विनंती.आज शारदीय नवरात्र महोत्सव ची पहिली माळ निमित्ताने पिंप्री येथील कुलस्वामिनीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या हा दि. १०/११/२०२३ वार शुक्रवार रोजी होणार आहे. तरी प्रथम श्री. कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर पिंपरखेड येथील मातेचे पुजन करून व आशीर्वाद घेऊन सस्नेह निमंत्रण पत्रिका ही मातेच्या चरणी ठेवाण्यात आली. यावेळी चामुंडा संस्थापक श्री. आत्माराम बडगुजर, श्री. भरत बडगुजर, व श्री. दत्तु बडगुजर, ह.भ.प. श्री. देविदास बडगुजर, श्री. अनिल बडगुजर, श्री. योगेश मोहकर सर, श्री. निलेश पवार, श्री. तुषार मोहकर, श्री विनोद मोहकर, हे उपस्थित होते. यजमान श्री. गोविंदराव रामदास बडगुजर सेवानिवृत्त उपकार्यकरी अभियंता, पाटबंधारे विभाग रा. पिंप्री ह. मु. पुणे यांच्या वतीने श्रीमद देवी भागवत महापुराण हे श्रीमद भागवत सेवक ह.भ.प. ज्योतीबाई वामनराव गरुड चाकणकर, आळंदी यांच्या अमृतमय वाणीतुन देवी भागवत कथेचे आयोजन हे कोजागिरी पौर्णिमा दि. २८ ऑक्टोबर ३०२३ ते दि.५ ऑक्टोबर २०२३ पर्यत रोज रात्री ८ते ११ या वेळेत असेल. पिंप्री खुर्द येथे श्री चामुंडा माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक १० नोव्हेंबर २०२३ शुक्रवार रोजी महंत श्री. प्रफुल्ल गिरी गोस्वामी मुख्य पुजारी चामुंडा माता मंदिर जुनागड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गोविंद रामदास बडगुजर व सौ. विद्या बाई गोविंद बडगुजर राहणार पिंप्री खुर्द हल्ली मुक्काम पुणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे .कार्यक्रम रूपरेषा :-कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर येथे कुलस्वामिनी चामुंडा माता प्राणप्रतिष्ठा, मुख्य हवन कुंड पुजा, श्री. हनुमानजी प्राणप्रतिष्ठा, कळस व ध्वजारोहण, श्री. गणेशजी प्राणप्रतिष्ठा , श्री शिवलिंग व नंदमूर्ती प्राणप्रतिष्ठा, कुलस्वामिनी श्री चामुंडा माता आरती व नैवेद्य व महाप्रसाद कार्यक्रम स्थळ:-श्री चामुंडा माता प्रांगण, पिंप्री खुर्द ता. धरणगांव जि. जळगांव.देणगी देण्यासाठी :-पिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगांव येेथील 🚩🚩कुलस्वामिनी चामुंडा माता 🚩🚩 मंदिर बांधकामासाठी आपल्या बडगुजर समाजातील बंधू आणि भगिनी आपणास स्वइच्छीत देणगी द्यायची असल्यास खाली दिलेल्या अकाऊंट नंबर वर ऑनलाइन वर्गणी जमा करु शकतात.कुलदैवत श्री चामुंडा मातेचे भव्य मंदीर उभारण्या साठी आपले सर्व समाज बंधू व भगिनी चे सहकार्य अपेक्षित आहेCENTRAL BANK OF INDIABRANCH :PIMPRI KHURDACCOUNT NO :3869513729IFSC CODE :CBIN0282591MICR CODE :425016736 खाली दिलेल्या नंबर वर पाठवावेत सोबत आपले संपूर्ण नांव, मूळ गांव, हल्ली मुक्काम लिहावा म्हणजे आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी सोपे जाईल ही विनंती.श्री.हरीष प्रकाश बडगुजर (अध्यक्ष) मो.नं.9922181950श्री.निलेश ईश्वर बडगुजर (सचिव) मो.नं.9970971213श्री. तुषार सुरेश मोहकर (खजिनदार) मो.नं.7620500814बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्दपिंप्री खु।। ता. धरणगांवगुगल लोकेशन :-सस्नेह निमंत्रण पत्रिका :