ताज्या बातम्या

जळगांव – भाजपच्या चित्राताई वाघ यांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी

भाजपा महिला मोर्चा, बोदवड़ तर्फे आज बोदवड़ पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले

जळगाव उमेश कोळी

आम्ही भाजप महिला मोर्चाच्या प्रतिनीधी समाजात महिला सबलीकरण करण्याचे तसेच सामाजिक आर्थिक स्तरावर महिलांना सक्षम करण्याचे काम करतोय जिथे जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे आम्ही आवाज उठवतो. पण सध्या आमच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रकार राष्ट्रवादीचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत. हे पाहता एक महिला म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही. आव्हाड यांनी ९ जून रोजी रात्री 12 वाजून 53 मिनिटांनी चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामकारक मजकूर ट्विटवर अपलोड केला आहे. चित्रा वाघ यांची मानहानी करण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठविण्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जिजाऊ, सावित्री बाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवले जात आहेत, हे सहन केले जाणार नाहीम्हणून महिला नेत्या चित्राताई वाघ यांची ट्विटरवरून बदनामी, मानहानी केल्याप्रकरणी आणि बदनामकारक मजकूर ट्विटरवर टाकल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी ही विनंती.

बोदवड़ पोलीस स्टेशनला भाजपा महिला मोर्चा जळगाव जिल्हा ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती.रेखाताईं पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मा.राजेंद्र गुंजाळ साहेब यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा जळगाव जिल्हा ग्रामीणच्या जिल्हाउपाध्यक्षा सौ.अनीताताई अग्रवाल, महिला मोर्चा शहर सरचीटणीस सौ.सुरेखाताई शर्मा, सौ.कविताताई जैन, राणीताई शर्मा, निर्मला शर्मा कार्यकर्त्ता भगींनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *