जळगांव : माहिती अधिकार अधिनियम-2005 बाबत आव्हाणे विद्यालयात मार्गदर्शन
माहिती अधिकार अधिनियम-2005 बाबत जनजागृती श्रीमती शा. पु. चौधरी माध्यमिक विद्यालय, आव्हाणे येथे दि 11.10.2023 रोजी केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम -2005 यास 18 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याअनुषंगाने विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही.डी.चौधरी यांचे आवाहनास अनुसरून आव्हाणे गावातील माहिती अधिकार मार्गदर्शक श्री. भगवान बापू चौधरी यांना अधिनियम जनजागृतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. शालेय दुपारील सत्रात सदर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. अधिनियम मार्गदर्शक श्री चौधरी यांनी माहिती अधिकार अधिनियम-2005 बाबत संपूर्ण विस्तृत व सोप्या स्वरूपात मार्गदर्शन केले. कायद्याचा वापर कसा करावा त्याचे फायदे -कमतरता याबाबत मांडणी करून विद्यार्थ्यांना अनमोल संबोधन केले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक श्री आय. आर. पाटील यांनी व आभारप्रदर्शन श्री डी. टी. पाटील सरांनी केले.