ताज्या बातम्या
जळगांव – स्वातंत्रवीर सावरकर जयंती निमित्त वीर सावरकर रिक्षा युनियन तर्फे रैलीचे आयोजन
जळगांव – स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर जयंती निमीत्त वीर सावरकर रिक्षा युनियन मार्फत दिनांक 28 मे 2023 रोजी जळगाव शहरात रैलीचे आयोजन करण्यात आले आहे तरी जिल्हाध्यक्ष श्री दिलीपभाऊ सपकाळे यांनी जळगाव शहरातील सर्व नागरिक, रिक्षा चालक-मालक ,स्कुल व्हन,स्कुल बस चालक-मालक आणी कुटूंबातील सर्व लहान थोर सदस्य यांनी सकाळी 8 वाजेस स्टेट बँक चौक, ला ना शाळा, जळगांव येथे उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. रैली स्टेट बँक चौक येथून कोर्ट मार्गे ,नेहरू चौक ,टॉवर चौक,जुने बस स्टॅण्ड ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून नवीन बस स्टॅण्ड मार्गे ,स्वातंत्रवीर सावरकर पुतळ्या जवळ रैलीची सांगता होईल. उष्णतेचे प्रमाण जास्त असल्या कारणानाने रैलीचे आयोजन सकाळी वेळेवर सुरु होईल. तरी सर्वांनी उपस्थिती देऊन रैलीचे शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.