जळगाव जिल्हा रुग्णालयात नाशिकच्या ‘गृहलक्ष्मी’ चा ३६ कोटींचा अपहार ?

सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील बन्सी यांची तक्रार (भाग – २)
जळगाव जिल्हा रुग्णालय आणि यावल ग्रामीण रुग्णालयांतर्गत नाशिक तालुक्यातील माडसांगवी (नांदूर) येथील गृहलक्ष्मी महिला औद्योगिक सहकारी संस्थेकडून साहित्य खरेदीत अपहार झाल्याच्या आरोपाने खळबळ उडाली असून तब्बल ३६ कोटी रुपयांच्या या कथित घोटाळ्यात वरिष्ठ अधिकारी आणि पुरवठादार यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असून ‘ चोर सोडून संन्यासाला फाशी ’ अशी परिस्थिती याठिकाणी निर्माण झालिया आहे. या प्रकरणात केवळ सहा कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करून मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप जळगाव येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बन्सी यांनी केला आहे.
तर, उपलब्ध कागदपत्रांनुसार, या संस्थेचे १८ कोटी ९२ लाख ८८ हजार ६४४ रुपयांचे प्रलंबित देयक अदा करण्याबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून तत्कालिन कालावधीत हालचाली करण्यात आल्या. मात्र, या देयकांमध्ये आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप आहे.
डॉ. बन्सी यांच्या या आहेत प्रमुख मागण्या –
- गृहलक्ष्मी महिला औद्योगिक संस्थेच्या सर्व कंत्राटांची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी व्हावी.
- या संस्थेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा.
- ज्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट केले आहेत, त्यांच्यावरही कारवाई व्हावी.
- भविष्यात अशा संस्थांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी.
हे आहेत आक्षेप –
- केवळ सहा कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करून मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न का ?. साहित्य पुरवल्याचे भासवून अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून घाईने पोचपावती आणि चलनावर स्वाक्षऱ्या / स्वाक्षरी झाली की, प्रत्यक्ष माल मिळाला आहे की नाही ? याची खात्री होण्यापूर्वीच देयके सादर करीत बिलाची थकीत रकमांवर व्याजासह वसुलीची धमकी देवून न्यायालयाचा धाक दाखवून देयके मंजूर करून घेण्याची ही विशिष्ट कार्यपद्धती ? २०१९-२० च्या असल्याचा आरोप.
- रुग्णालयाने निधीची मागणी केलेली नसतानाही वरिष्ठ कार्यालयाकडून प्रचंड निधी वर्ग, जो थेट पुरवठादारांच्या खिशात ज्या जिल्हा शल्य चिकित्सकांच्या काळात हे व्यवहार झाले, त्यांना मात्र अहवालात क्लीन चिट देण्याचा प्रयत्न?
- या प्रकरणात २० वैद्यकीय अधीक्षकांनी, २० भंडारपालांनी या स्वाक्षऱ्या केल्या, त्यांच्यावर कारवाई का नाही? पुरवठा दाराने १३ ग्रामीण रुग्णालयांना पुरवला केवळ १८ कोटी ९२ लाखांचा माल आणि जास्तीची रक्कम रु. ३१,३३,४८,८७८/- मागणी करण्यात आली असल्याचा आरोप.
- रक्कम मागणी करण्यात आली असल्याचा आरोप.
- जिल्हा कोषागार पूर्तता नसल्याने रक्कम अदा करण्यास नकार !
- या प्रकरणाची चौकशी करून पुरवठादारापर्यंत पोहोचल्यास मोठे मासे अडकू शकतात, म्हणून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप !
या संदर्भात उप संचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिकचे डॉ. कपिल आहेर यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.


