ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशन आणि जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड या संस्थांच्या संचालक पदी संजय पवार यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधि / विनोद रोकडे

जळगांव – 2025 ते 2030 या कालावधीसाठी होऊ घातलेल्या जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशन आणि जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड या संस्थांच्या सुरू असलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी एकही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे फक्त संजय पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याकारणाने दोन्ही संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन भाऊसाहेब संजय जी पवार यांची अविरोध निवड करण्यात आलेली आहे ,जळगाव जिल्हा सहकार बोर्ड ही अनेक वर्षापासून ची संस्था आहे सदर संस्थेचे कामकाज म्हणजे जळगाव जिल्ह्यातील सहकार संस्थांना मार्गदर्शन करणे विविध कार्यकारी सोसायटी मध्ये कार्यरत असलेले गटसचिव यांना प्रशिक्षण देणे हे काम सहकार बोर्डामध्ये पूर्वीपासून केले जात आहे. तसेच या संस्थेमध्ये जळगाव जिल्ह्यातील मान्यवर जेष्ठ पदाधिकाऱ्यांचा सहभाग असायचा तसेच जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशन या संस्थेला देखील मोठा इतिहास आहे, सहकार बोर्डाची स्थापना 1948 सालि झालेलि असून स्थापनेचे अध्यक्ष रावबहादुर स्वर्गीय वामनराव सावंत होतें, त्यानंतर स्वर्गीय व्यंकटराव भघाजी पाटील स्वर्गीय माजी आमदार भाऊसाहेब टीटी साळुंखे, स्वर्गीय माधवराव गोटू पाटील माजी आमदार, स्वर्गीय बापूराव हिम्मतराव देशमुख अशा अनेक मान्यवरांनी या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली होती हल्ली विद्यमान अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक प्रदीप दादा देशमुख हे आहेत तसेच जळगाव जिल्हा कॉटन मार्केटिंग फेडरेशन या संस्थेची स्थापना देखील 1948 साली झाली होती या संस्थेचे संस्थापक चाळीसगाव तालुक्यातील स्वर्गीय रामराव
जीभाऊ पाटील हे होते त्यानंतर या संस्थेत स्वर्गीय दामू भाऊ पांडू पाटील ,स्वर्गीय उदयसिंग अण्णा पवार या मान्यवरांनी देखील अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली होती हल्ली विद्यमान अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे चेअरमन भाऊसाहेब संजय जी पवार हेच आहेत. या सहकारी संस्थेत देखील जळगाव जिल्ह्यातील सहकार महर्षी मान्यवरांनी कामकाज केलेले आहे आणि अशा दोन्ही संस्थांच्या संचालक पदी भाऊसाहेब संजय पवार यांचा सहकार क्षेत्रा मध्ये आपल्या कामाचा अनुभव लक्षात घेता संजय पवार यांची बिनविरोध निवड झालेली आहे जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ जळगाव जिल्हा सहकार बोर्ड जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज जळगाव जिल्हा पीक संरक्षण फेडरेशन जळगाव जिल्हा देखरेख सहकारी संघ महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन अशा विविध अनेक शेतकरी त्याच्या संस्थांमध्ये संजय पवार काम करत आहे त्यांच्या या निवडीबद्दल सदर संस्थांच्या सभासदांनी अभिनंदन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *