जळगाव – धरणगाव येथील चोपडा रस्त्यावरील एका खासगी जिनिंग मध्ये रेशनचा काळाबाजार !
धरणगाव – शहरात चोपडा रस्त्यावरील एका खासगी जिनिंग मध्ये धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. धरणगावहून चोपड्याकडे जातांना मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या या जिनिंग मध्ये एक भले मोठे धान्य गोडाऊन आहे. याठिकाणी रेशन च्या धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
सदर गोडाऊन मध्ये अमळनेर, चोपडा, धरणगाव, ग्रामीण भाग, शिरपूर, मध्य प्रदेश या ठिकाणाहुन छोट्या माल वाहतूक वाहनामधून रेशन चा माल खरेदी करून याठिकाणी खाली केला जात असतो. दिवसाला शेकडो क्विंटल माल याठिकाणी जमा केला जातो. सदर माल हा ठोक स्वरुपात जमा झाल्यानंतर या मालाची विक्री गुजरात, धुळे, पारोळा, चोपडा याठिकाणी केली जाते. यासंदर्भात धरणगाव पुरवठा विभाग मात्र मुग गिळून गप्प आहे. गरिबांच्या धान्याचा काळाबाजार थांबविण्यात यावा अशी मागणी होतांना दिसून येत आहे.