जवखेडे सिम येथील सरपंच अपात्र, शासकीय जमिनिवर अतिक्रमण केल्याचे प्रकरण भोवले
जळगाव – एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम येथील ग्राम पंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्री दिनेश जगन्नाथ पाटील यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्या मुळे त्यांना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे म्हणून श्री प्रवीण दत्तु पाटील यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर चौकशी होऊन, बेकायदा अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे, जिल्हाधिकारी श्री डॉ.अभिजित राऊत यांनी दिनेश पाटील यांना अपात्र ठरविले होते. त्या विरुद्ध नासिक येथे अपील दाखल केले होते. सदर अपिलावर सुनावणी होऊन दिनेश पाटील यांना सरपंच व सदस्य पदावरुन अप्पर आयुक्त श्री भानुदास पालवे यांनी दिनांक 28.7.2022 रोजी अपात्र ठरविले आहे.
या बाबत सर्विस्तर वॄत असे कि, जवखेडे सिम ता.एरंडोल येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश जगन्नाथ पाटील यांनी शासकीय जमिनीवर विना परवानगी अतिक्रमण केल्यामुळे त्यांना सदस्य व सरपंच पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून श्री प्रवीण दत्तु पाटील यांनी ग्रा.प.अधिनियम 1958 चे कलम 14 जे- 3 प्रमाणे जिल्हाधिकारी यांचे कडे विवाद अर्ज क्र-45/ 021 ने तक्रार दाखल केली असता त्यावर चौकशी होऊन सरपंच यांनी शासकीय जमिनीवर, शासनाची कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशिर व अनधिकृत पणे शासकीय जमिनीवर भोगवटा सदरी स्वतःचे नाव लावुन घेतले होते व सदर जागा मिळकत ताब्यात ठेवून पदाचा दुरूपयोग केला. ही बाब असल्याचे सिद्ध झाल्यामुळे दिनेश पाटील (आमले) यांना ग्रा.प.सरपंच व सदस्य पदावरुन जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी अपात्र ठरविले होते. त्या निर्णया विरुद्ध नासिक येथे अपील केले असता त्यावर कायदेशीर सुनावणी होऊन. माझी आत्या कै. वजाबाई देवराम पाटील यांना शासनाने घरकुल दिले होते व आत्यास कोणीही वारस नसल्या मुळे त्यांनी सदर जागा मिळकत माझे नावे करुण दिली होती. मी स्वत: हुन अतिक्रमण केलेले नाही हा अपिलार्थि यांचा बचाव फेटाळण्यात येऊन जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम ठेऊन अप्पर आयुक्त श्री पालवे यांनी दिनेश पाटील यांना सरपंच व सदस्य पदावरून अपात्र ठरविले आहे.
या निकाला मुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. तक्ररदार श्री प्रवीण दत्तु पाटील यांचे वतीने अँड.विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले. या निकाला कडे परिसराचे व तालुक्याचे लक्ष्य लागून होते.