जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

जळगाव दि. १४ प्रतिनिधी – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या जैन फूड पार्क मध्ये अग्रिशमन सेवा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दि. १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.”संघटीत व्हा, अग्नि सुरक्षित, भारताला प्रज्वलित करा” या थीमवर वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन कंपनीच्या आस्थापनांमध्ये केले जाणार आहे.
आग विझविण्यासाठी धारातीर्थी शहीद अग्निशमन जवानांना, जैन फुड पार्क येथील अग्निशमन विभागाच्या सहकाऱ्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जैन फूड पार्क, जैन व्हॅली व जैन इरिगेशन प्लास्टिक पार्क येथील अग्निशमन सेवा साजरा करण्यात आला. जैन फुड पार्क येथील अधिकारी सुनील गुप्ता, व्ही. पी. पाटील, जी. आर. पाटील, असलम देशपांडे, वाय. जे. पाटील, संजय पारस तसेच अग्निशमन दलाचे सहकारी निखिल भोळे, कैलास सैदांणे, मनोज पाटील, नितीन चौधरी, हेमकांत पाटील प्रवीण पाटील,सागर बागुल, जितेंद्र पाटील, देवेंद्र पाटील, महेंद्र पाटील, जे जे पाटील व कंपनीतील सहकारी उपस्थित होते.
दि. १४ एप्रिल १९४४ रोजी फोर्टस्टीकेन मालवाहतूक जहाज व्हिक्टोरिया डॉक (मुंबई) येथे स्फोटकांना लागलेली आग विझविताना अग्निशमन दलाचे ६६ जवान मृत्युमुखी पडले होते, त्यांना श्रध्दांजली म्हणून अग्निशमन सेवा दिवस व सप्ताह साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात सुरक्षिततेबाबत प्रत्येकाने सतर्क रहावे यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करुन जनजागृती घडविली जाते. अग्निशमन दलाचे सहकारी कैलास सैदांणे यांनी आगीवर नियंत्रण कसे करावे व आग लागू नये यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि दुदैवाने आग लागली, तर बचाव आणि इत्यादींबाबत सखोल माहिती दिली.