झेप प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अयोध्या नगर येथे पडला पार

जळगाव – झेप प्रतिष्ठान तर्फे अयोध्या नगर परिसरात १० वी व 12 वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा क्रिडा अधिकारी संजीव कुलकर्णी, प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक सुनील खडके,विरेन खडके, प्रदिप रोटे, राजेंद्र पाटील सर व प्रदिप पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला .
१० वी व 12 वी परिक्षेत सर्वोत्तम टक्के असलेल्या, आणि मराठी विषयात सर्वोत्तम मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना फोल्डर फाईल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रिडा क्षेत्रात पण आपले योगदान द्यावे जेणेकरून त्यांना नोकरी मध्ये अधिक गुणांचा फायदा मिळु शकतो असे माजी जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
झेप प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था असून शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात असे संस्थेचे सचिव अविनाश पाटील यांनी मत व्यक्त केले.
शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना खरच कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर देणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांना शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते असे कार्यक्रमाचे आयोजक सौ हर्षदा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश पाटील, संदिप मांडोळे,जयंत पाटील,मानसी पाटील,हर्षल वाणी, प्रेम भावसार,प्रणय चौधरी, सचिन पवार, यांनी अधिक परिश्रम घेतले होते.