ताज्या बातम्या

डॉ हेडगेवार नगर ख्वाजा नाईक आश्रम शाळेत गोवरचा शिरकाव ; १९ विद्यार्थ्यांना लागण

धरणगाव प्रतिनिधी । विनोद रोकडे

धरणगाव तालुक्यातील डॉ हेडगेवार नगर येथील ख्वाजा नाईक मुलांच्या निवासी आश्रमशाळेत गोवरचा (Measles) शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट झाली आहे. आश्रमशाळेतील १९ विद्यार्थ्याला गोवरची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, १९विद्यार्थ्यांना संशयित म्हणून वेगळे ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे धरणगाव ग्रामीण रुग्णालय आरोग्य विभाग तातडीने कामाला लागले असून, युद्धपातळीवर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव आरोग्य विभागाकडून२३सप्टेंबररोजी आश्रमशाळेत नियमित आरोग्य तपासणी झाली त्यानंतर विद्यार्थ्यांना दिनांक ६ऑक्टोबर २५ सोमवार रोजी त्रास जनावल्याने ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता विद्यार्थ्यांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आली. . यानंतर, धरणगावसंपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.

आरोग्य विभागाने युद्धपातळीवर कार्यवाही करत आश्रमशाळेतील सर्व १९ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. संशयित व लागण झालेल्या विद्यार्थ्यांना धरणगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात (आयसोलेट) ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी मनोज पाटील यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गट प्रवक्ते पी एम पाटील सर माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, युवासेना उपजिल्हा प्रमुख महेंद्र महाजन, शिवसेना शहर प्रमुख भागवत चौधरी, युवासेना उपजिल्हा संघटक विनोद रोकडे रणजित सिकरवार, प्रेमराज चौधरी, रमेश चव्हाण यांनी तब्येत ची विचार पूस करून प्रशासन ला सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *