तबारक फाऊंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
आज दि. 29/06/2024 शनिवार रोजी दोंडाईचा वरवाडे नगर परिषद संचलित भारतरत्न डॉ. जाकिर हुसैन नगर परिषद उर्दु शाळा क्र. 11 दोंडाईचा येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तबारक फाऊंडेशन यांच्या विशेष सहकार्यातून व खलील धोबी यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक साहित्य म्हणून वह्या वाटप करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेतला.यावेळी तबारक फाऊंडेशन तर्फे सय्यद अरशद अली, वसीम धोबी (बॉस), हकीम सिकलगर, अरबाज शेख यांची प्रमुख उपसथिती होती तर शाळेचे मुख्याध्यापक अन्सारी हबीबुरर्हेमान, प्रशांत आहिरे, भटू पवार,अल्मास मिया, खलील धोबी, अन्सारी सलमान, मुजम्मिल अहमद, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व पालक मोठ्या संख्येने हजर होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सय्यद अरशद अली हे होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणात सहकार्य होईल व त्यांचा उज्वल भवितव्य घडेल असा विश्वास अध्यक्षांनी व्यक्त केला.प्रस्ताविक खलील धोबी यांनी केले. सूत्रसंचालन अन्सारी हबीबुरर्हेमान सर यांनी केले. मुजम्मिल अहमद यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व पालकांनी परिश्रम घेतले.