त्या खाजगी शिकवणी चालविणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा करा

संयुक्त पत्रकार संघ उमरखेड व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
उमरखेड प्रतिनिधी / रितेश पाटील
गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या धानकी येथील नराधमास कठोरात कठोर शिक्षा करण्याबाबत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना उपविभागीय अधिकारी उमरखेड कार्यालय मार्फत संयुक्त पत्रकार संघ उमरखेड ने निषेध व्यक्त करत निवेदन दिले आहे.
ढाणकी येथील खाजगी शिकवणी घेणाऱ्या संदेश गुंडेकर वय २७ वर्षे याचे कडे शिकवणी वर्गाकरिता गरीब हलाखीच्या परिस्थितीत आपल्या लेकीला शिकविणाऱ्या आई-वडिलांनी शिकवणी वर्ग लावला होता, याचा फायदा काही संदेश गुंडेकर या नराधमाने सदर मुलीचा तिच्या एकूण कौटुंबिक परिस्थितीचा फायदा घेत बलात्कार करून अल्पवयीन चिमुकल्या मुलीस मृत्यूच्या खाईत लोटले असून या समाजविघातक घटनेचा संयुक्त पत्रकार संघ उमरखेड कडून जाहीर निषेध व्यक्त करून मा. मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर शिक्षक कोणत्या विभागाच्या परवानगीने खाजगी शिकवणी चालवीत होता याची चौकशी करावी तसेच शहरी व ग्रामीण भागात खाजगी शिकवणी वर्गाने जोर धरला असून या शिकवणी वर्गाच्या माध्यमातून पालक वर्गाची आर्थिक पिळवणूक केल्या जात आहे अशा खाजगी शिकवणी चालविणाऱ्या ना परवानगी आहे का? परवानगी असेल तर ती कोणामार्फत मिळाली याची योग्य ती चौकशी करण्यात येऊन सामान्य पालक वर्गाच्या होणाऱ्या आर्थिक लुटीस थांबविण्याबाबत तसेच गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या खाजगी शिकवणी चालविणाऱ्या ढाणकी येथील त्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा करावी जेणेकरून असे कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीस आळा बसावा व त्या चिमुकल्या मुलीस मरणोपरांत न्याय मिळवून देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती संयुक्त पत्रकार संघ उमरखेड कडून देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.