दिव्यांगांच्या अर्थसहाय्याबाबत तहसीलदारांशी अपंग महासंघाची चर्चा

शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे प्रशासनाचे आश्वासन; तहसीलदार सूर्यवंशी
धरणगाव प्रतिनिधी विनोद रोकडे
धरणगाव : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मासिक अर्थसहाय्यात एक हजाराची वाढ झाली, परंतु धरणगाव तालुक्यातील अनेक दिव्यांगांना वाढीव अर्थसहाय्य मिळावा. तसेच, दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळावा. या मागणीसाठी अपंग महासंघाच्या प्रतिनिधींनी धरणगाव तहसीलचे मा.तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. तहसीलदार सूर्यवंशी यांनी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांगांच्या संबंधित सर्व समस्या समजून घेत म्हणाले की, दिव्यांग बांधव हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत, त्यांच्या सन्मान आणि स्वावलंबनासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. प्रत्येक दिव्यांगांना त्यांचा अधिकार मिळणार असल्याचे श्री.सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच बैठकीत अपंग महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील व पदाधिकारी रमेश चौधरी, बाबुलाल पाटील, मुकुंदा देशपांडे, अस्लम मण्यार, रविंद्र काबरे, राजेंद्र फुलपगार, प्रमोद सुतारे, राजू चौधरी आदींसह असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते. याप्रसंगी प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल संजय पाटील व महासंघाने तहसीलदारांचे आभार मानले.