ताज्या बातम्या
धरणगांव येथील मरीआई मंदीर संस्थान व जागृती युवक मंडळाच्या वतीने महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगांव – येथील मरीआई मंदीर संस्थान व जागृती युवक मंडळाचा वतीने शहरातील ग्रामदैवत मरीआई मंदीर जिर्णोद्धाराचा निमित्ताने भंडाराचे (महाप्रसादाचे) आयोजन करण्यात आले आहे शहराचा पुर्वेस अतिशय पुरातन ब्रिटीश काळातील उभारलेल्या ह्या मंदीराचे नुकताच जिर्णोद्धार करण्यात आला त्या अनुषंगाने नव्याने बांधण्यात आलेल्या ह्या मंदीराचा जिर्णोद्धारासाठी शहरातील व परिसरातील असंख्य दानशूर दात्यांनी आपल्या सरळ हाताने आर्थिक देणगी देवुन सहकार्य केले तरी दि.27 जानेवारी मंगळवार रोजी होत असलेल्या ह्या महाप्रसादाचा कार्यक्रमात पंधरा हजार लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून शहरातील सर्व समाज बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा व महाप्रसादा साठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


