धरणगांव येथील महाराणा प्रतापसिंह प्रवेशद्वाराचे काम तातडीने सुरू करण्याची अखिल भारतीय क्षत्रिय महासभेची मागणी

धरणगांव प्रतिनिधी / विनोद रोकडे अमळनेर रोड चौफुली येथे उभारण्यात येणाऱ्या महाराणा प्रतापसिंह प्रवेशद्वाराचे काम तातडीने सुरू व्हावे, या मागणीसाठी आज अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष श्री.पंकज सिंह बयस यांच्या नेतृत्वाखाली निवेदन मा.आ. श्री. गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. या निवेदनात समाजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या या प्रवेशद्वारामुळे शहराचे सौंदर्य वाढेल तसेच भावी पिढ्यांना शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच या कामाची प्रशासकीय कार्यवाही गतीने करून प्रवेशद्वाराचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी विनंतीही करण्यात आली. यावेळी मा.आ.गुलाबरावजी पाटील साहेबांनी प्रवेशद्वाराचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष पंकज भाऊ बयस, तालुका अध्यक्ष मुकेश चौहान, लीगल सेल तालुका अध्यक्ष ॲड.कुलदीप चंदेल, विजय राजपूत, पराग चौहान, ॲड.हर्षल चौहान, आशिष बायस, हर्षल बयस, प्रफुल चंदेल इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


