धरणगावकरांच्या वतीने जिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत !

न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही यात्रा; सौरभ खेडेकर
धरणगाव प्रतिनिधी – विनोद रोकडे
धरणगांव : शहरात आज रोजी मराठा सेवा संघ संचलित “जिजाऊ रथ यात्रा २०२५” चे मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतीषबाजी करून स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा महासंघाचे महासचिव प्रा.अर्जुन तनपुरे आणि संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिजाऊ रथ यात्रेचे आयोजन केले होते. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. तत्पूर्वी प्रमुख अतिथी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. जिजाऊ रथयात्रेची सुरुवात शहाजी महाराज जयंती १८ मार्च २०२५ भोसले गडी, वेरूळ, छ. संभाजीनगर येथून सुरुवात करण्यात आली असून ४५ दिवसांच्या रथयात्रेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख शहरे, निमशहरे आणि गावांमध्ये जनसंवाद साधून कोकणातील तळभाग वगळता संपूर्ण राज्यभर हा ऐतिहासिक उपक्रम पार पडणार आहे. या रथयात्रेच्या समारोप १ मे २०२५ महाराष्ट्र दिन व कामगार दिन या दिवशी लाल महाल पुणे येथे होणार आहे.
संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व जिजाऊ रथयात्रा बहुजन मराठा जोडो अभियान या संदर्भात विस्तृत माहिती सांगितली. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष ज्योती पाटील, वैशाली पवार, ज्योती जाधव, मनिषा पाटील, नीना पाटील, रेखा पाटील, सुनीता पाटील आदींनी जिजाऊ माँसाहेब यांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन केले. जिजाऊ रथ यात्रेच्या स्वागत प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राज्यसचिव आबासाहेब राजेंद्र वाघ, संभाजी ब्रिगेड (सामाजिक) जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत माळी, बुद्धिष्ट इंटरनॅशनलचे निलेश पवार, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते भानुदास विसावे, माळी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन, पाटील समाजाध्यक्ष माधवराव पाटील, तिळवण तेली समाजाध्यक्ष सुनील चौधरी, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, भाजपाचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संजय महाजन, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, काँग्रेसचे महेश (बंटी) पवार, शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे, शहरप्रमुख विलास महाजन, पत्रकार भगीरथ माळी, ॲड.व्ही एस भोलाणे, धर्मराज मोरे, अविनाश बाविस्कर, विनोद रोकडे, विकासराव पाटील, संविधान अभ्यासक ॲड.रविंद्र गजरे, शिवसेनेचे शहरप्रमुख भागवत चौधरी, नगरसेवक जितू धनगर, कैलास माळी, भिमराव धनगर, किरण मराठे, महेंद्र (भैय्या) महाजन, करण वाघरे, परशूराम पाटील, प्रभूदास जाधव, रामकृष्ण मराठे, बबलू मराठे, दिपक मराठे, गणेश मराठे, चंदू मराठे, भिका मराठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शाम पाटील, जेष्ठ नेते अरविंद देवरे, मोहन पाटील, हेडगेवार ग्रा.पं.चे उपसरपंच चंदन पाटील, सदस्य संभाजी सोनवणे, दिनेश पाटील, गोपाल पाटील, वाल्मिक पाटील, बुट्या पाटील, जितेंद्र पाटील, गुलाबराव मराठे, नामदेव मराठे, राहुल पवार, भागवत मराठे, सोपान मराठे, भास्कर बत्तीसे, गोरखनाथ देशमुख, विक्रम पाटील, प्रा.आकाश बिवाल, कैलास पवार, सुधाकर मोरे, सुनिल देशमुख, सुरज वाघरे, ललित मराठे, संतोष सोनवणे, मयूर भामरे यांसह शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जिजाऊ रथ यात्रेच्या स्वागत दरम्यान धरणगाव पोलीस स्थानकाचे पोहेकॉ. संजय सूर्यवंशी, सत्यवान पवार, सुमित बाविस्कर, महेंद्र पाटील, समाधान भागवत आदी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.