धरणगावचे तहसीलदार याना ठाकरे गटाने रोप भेट देऊन दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव चे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्यात. आज ३ ऑगस्ट २०२५ रोजी धरणगाव चे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचा वाढदिवस असल्याने ठाकरे गटाच्या वतीने त्यांची भेट घेत पक्षाच्या वतीने आंब्याचे रोप भेट देऊन महेंद्र सूर्यवंशी याना अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्यात. यावेळी सूर्यवंशी यांनी आपण कोणताही राजकीय मतभेद न ठेवता कार्य करीत असतो असे म्हणत मी आपल्या शुभेच्छांचा आनंदाने स्वीकार करतो असे म्हटले. प्रसंगी ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
आज रविवार रोजी सुटी असून देखील तहसीलदार सूर्यवंशी हे शासकीय कामानिमित्त कार्यालयातच हजर होते. तसेच तालुक्यातील विविध ठिकाणी महसूल सप्ताह निमित्त त्यांनी शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करीत शेत पाणंद रस्ते तसेच वृक्षारोपणाचे कार्यक्रमाचे आयोजन केलेत. याबद्दल त्यांचे गुलाबराव वाघ यांनी विशेष कौतुक केले.