धरणगावातील प्रभागातील मतदार याद्यांमध्ये मोठी गडबड

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी ची घोषणा होताच राजकीय हालचाली ना वेग आला असून प्रभाग आरक्षण नंतर बुधवारी जाहीर झाली मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोधळ निर्माण झाला आहे अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकल्याने इच्छुक उमेदवारांची यांना जोर आला आहे.धरणगाव सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रभाग आरक्षणानंतर गुरुवारी जाहीर झालेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागांमध्ये टाकल्याने इच्छुक उमेदवारांची चांगलीच धांदल उडाली आहे.विशेषतः प्रभाग क्रमांक ४ मध्ये तब्बल २०० हून अधिक मतदारांची नावे इतर प्रभागांत आढळून आली आहेत, तर काही बाहेरील प्रभागातील नावे या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. या प्रकारामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नावांच्या या गोंधळामुळे इच्छुक उमेदवार बारकाईने मतदार यादीचा अभ्यास करून अर्ज भरण्याच्या तयारीत गुंतले आहेत. हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत १३ ऑक्टोबर असल्याने सध्या मतदारयाद्यांबाबत चौकशी, तक्रारी प्रकरणी शिवसेना उ बा ठा चे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सदोष मतदार यादी मागे घेऊन नव्याने शुद्ध यादी जाहीर करण्याची मागणी केली असून, तसे न झाल्यास पालिकेसमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्याधिकारी राम निवास झंवर म्हणाले, प्रभागातील नावे इतरत्र गेली असल्यास नागरिकांनी १३ ऑक्टोबरपर्यंत हरकती नोंदवाव्यात. त्या हरकतींचे निवारण करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येईल आणि त्यानंतर योग्य प्रभागात नाव समाविष्ट केले जाईल. नागरिकांनी सहकार्य करावे.पाच वर्षांनंतर होणाऱ्या य निवडणुकीपूर्वीच मतदार याद्यांतील गोंधळामुळे धरणगाव राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील काही दिवसांमध्ये यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.