धरणगावात उद्या संगिताचार्य स्व.लक्ष्मीचंद डेडिया स्मरणार्थ “तृतीय स्वरांजली”

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व स्व.लक्ष्मीचंद डेडिया सर शिष्य परिवार यांच्यावतीने “तृतीय स्वरांजली महोत्सव” रविवार दि. १० ऑगष्ट रोजी संध्याकाळी ६ ते ९ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात भक्तीगीत, भावगीत, भजन, शास्त्रीय आणि सुगम संगीतसंध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी जेष्ठ संगीतमहर्षी आर. बी. पाटील (धरणगाव), दुष्यंत जोशी (जळगाव), प्रसिद्ध बासरी वादक योगेश पाटील (एरंडोल), व्हॉयोलिन वादळ, भूषण चौधरी (हरिद्वार) हे स्वरांजली सादर करणार आहेत. याचवेळी शहरातील हौसी कलावंत आपली कला सादर करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धरणगाव नपाचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर भुषविणार असून उद्घाटन खान्देशातील प्रसिद्ध कवी, लेखक, साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार,तसेच माजी उपप्राचार्य श्री.अजित डहाळे, श्री कांतीलाल सेठ डेडिया राहणार आहेत. धरणगावातील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या सभागृहात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने श्रोत्यांनी उपस्थित राहन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कलावंतांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन श्री आदिनाथ दिगंबर ट्रस्ट व स्व. लक्ष्मीचंद डेडिया शिष्य परिवार तर्फे राहुल जैन,श्रेयान्स जैन,प्रतीक जैन,निकेत जैन,पियुष डहाळे,प्रदीप झुंझारराव,तनय डहाळे,ए आर पाटील सर,नितीन जैन,सुयश डहाळे,प्रमोद जगताप, नाना पवार, सुजित जैन यांनी केले आहे.


