धरणगावात ‘रन फॉर युनिटी’ उपक्रम उत्साहात

▪️राष्ट्रीय एकतेचा संदेश आणि देशभक्तीचा उत्सव; तहसीलदार सूर्यवंशी
धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव : भारताचे लोहपुरुष व देशाच्या एकीचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार रोजी राष्ट्रीय एकता दिवस धरणगाव येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी एकतेचे संदेश देणारे उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून, मा. पोलिस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव पोलिस स्टेशन तर्फे “Run for Unity – एक दौड देश की एकता और अखंडता के लिए” हा उपक्रम उत्साहात पार पडला. या रन फॉर युनिटी उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून परिहार चौक, मार्गे कोट बाजार, मेन रोड, धरणी बाजार, भडंगपुरा, व्हाईट हाऊस, बस स्थानक आणि पोलिस स्थानक येथे समारोप करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून झाली, व राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक शपथ घेण्यात आली.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले की, या उपक्रमाचा प्रमुख उद्देश देशातील ऐक्य, अखंडता व एकात्मतेचा संदेश समाजात पोहोचविणे हा होता. या निमित्ताने राष्ट्रीय एकतेचा संकल्प घेत सहभागी धावपटूंनी देशभक्तीचा उत्साह प्रकट केला. तद्नंतर तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी मनोगतात म्हणाले की, राष्ट्रीय एकतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ‘रन फॉर युनिटी’ सारख्या उपक्रमांमुळे युवकांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि एकजूट वाढीस लागते. दौडीच्या माध्यमातून एक देश, एकता, अखंडता याचा दृढ संदेश समाजात पोहोचला असेही तहसीलदार सूर्यवंशी म्हणाले.
या कार्यक्रमाला धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक सुनील पवार, पो.उ.नि. प्रशांत कंडारे, पीएसआय दत्तात्रय बडगुजर, नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, तसेच रामकृष्ण महाजन, शमशोद्दीन शेख, अण्णा महाजन, दिपक वाघमारे, पो.स्टे. चे पोहेकॉ. सत्यवान पवार, सुमित बाविस्कर, चंदन पाटील, किशोर भोई, अनिल मोरे, समाधान भागवत, यांसह पत्रकार बांधव, होमगार्ड, पोलीस पाटील, नगरपरिषद कर्मचारी, सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.


