ताज्या बातम्या

धरणगावात सफाई कर्मचाऱ्यांना पेढा भरवत साजरी झाली गाडगेबाबा जयंती

नगरसेवक सुनीलभाऊ चौधरी यांचा अभिनव उपक्रम..!!

धरणगाव – आधुनिक संत गाडगेबाबा हे ग्राम स्वच्छतेचे आणि समतेचे प्रतीक समजले जातात. त्यांच्या नावाने महाराष्ट्रात ठिकठिकाणी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत असते. या अभियानात गाडगेबाबांचा आदर्श ठेवून गाव स्वच्छता करणाऱ्या नगरपालिका सफाई कामगारांचे मोठे योगदान असते, ही सामाजिक जाणीव आणि संवेदना लक्षात घेऊन येथील नगरसेवक सुनीलभाऊ चौधरी यांनी धरणगाव येथील नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला आणि पेढा भरवून गाडगेबाबांची जयंती साजरी करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. कुठल्याही महापुरुषांची जयंती ही महापुरूषांना हारतुरे अर्पण करून होत असते. मात्र या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन महापुरुषांचे आचार आणि विचारांची खरी जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे.ती जाणीव नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये दिसत असल्याने आपण या कर्मचाऱ्यांसोबत संत गाडगेबाबा जयंती साजरी केली असल्याचे नगरसेवक सुनीलभाऊ चौधरी यांनी सांगितले. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक होत असून सफाई कामगारांनीही आनंद व्यक्त केला आहे.
या वेळी नगरपालिकेचे मुकादम व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *