धरणगावात १७० जणांना प्रतापराव पाटलांच्या हस्ते जागेचे उतारे वाटप
प्रतिनिधी – विनोद रोकडे
ॲड.भोलाणे व कंखरे यांच्या प्रयत्नातून बेघरांचे दिवास्वप्न अखेर सत्यात; प्रा.डी आर पाटील
धरणगाव : शहरातील नेहरूनगर परिसरातील १७० पेक्षा अधिक अतिक्रमणग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या जागेचे कायमस्वरूपी उतारा माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यासह धरणगावचे तहसीलदार तथा दंडाधिकारी महेंद्र सुर्यवंशी, जेष्ठ नेते डी जी पाटील, प्रा. डी आर पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ॲड. व्ही एस भोलाणे यांनी शासन-प्रशासनाशी एक वर्षांपासूनचा चालू असलेला संघर्ष मांडला आणि शासन, प्रशासनासह मोलाचे योगदान असलेले ना.गुलाबराव पाटील यांचे आभार देखील व्यक्त केले. उतारा वाटप प्रसंगी प्रा.डी आर पाटील यांनी मनोगतातून सांगितले की, नेहरू नगरातील रहिवाशी अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. परंतू ह्या उपेक्षित बांधवांना स्वतःचा मालकी उतारा नसल्याकारणाने अडचण येत होती. सदरील अतिक्रमित घरं नियमित करण्यासंदर्भात शासन-प्रशासन कडे कित्येक वर्षांपासून वेळोवेळी मागणी करत होते. परंतू त्यांच्या मागणीला यश मिळत नव्हते. अश्या सामाजिक जाणिवेतून, गावाच्या हितासाठी आपलं काही देणं लागतं ह्या शुद्ध भावनेनं जेष्ठ पत्रकार तथा भाजप नेते ॲड. व्ही एस भोलाणे व सामाजिक कार्यकर्ते प्रा.रविंद्र कंखरे यांनी सदरील बेघर रहिवाशांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जळगाव ग्रामीणचे आमदार तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून सदरील विषय शासन दरबारी संघर्ष करीत आज रोजी उपेक्षित व दुर्लक्षित १७० बेघर बांधवांना कायमस्वरुपी उतारा वाटप करून खरा न्याय मिळवून दिला व बेघर बांधवांनी पाहिलेले दिवास्वप्न अखेर सत्यात उतरल्याचे प्रा.पाटील म्हणाले. तद्नंतर जेष्ठ नेते डी जी पाटील यांनी सांगितले की, सदरील बेघर बांधवांना स्वतःचा हक्काचा उतारा मिळावा संदर्भात ना.गुलाबराव पाटील यांच्या पाठबळाने व अतिक्रमित (बेघर) संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. व्ही एस भोलाणे, समितीचे सचिव रविंद्र कंखरे यांच्या अथक प्रयत्नांतून ‘न भूतो न भविष्यती’ ह्या उक्तीप्रमाणे घराचा उतारा मिळवून दिल्याचे श्री.पाटील म्हणाले. जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून सर्वप्रथम पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, ॲड. व्ही एस भोलाणे, रविंद्र कंखरे यांचे अभिनंदन करीत पुढे म्हणाले, बेघर समितीचे अध्यक्ष ॲड. भोलाणे व सचिव कंखरे यांच्या अथक प्रयत्नांनी व जळगांव ग्रामीणचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या माध्यमाने दुर्लक्षित बेघर बांधवांना कायमस्वरुपी उतारा मिळवून देण्याचे काम केले आहे आणि येत्या दोन दिवसांत तब्बल ५०० नागरिकांना देखील हक्काचा उतारा मिळणार असल्याचे प्रतापराव पाटलांनी सांगितले. याप्रसंगी विचार मंचावर जेष्ठ नेते डी जी पाटील, प्रा. डी आर पाटील, तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, संजय महाजन, विनय भावे, विजय महाजन, रतिलाल चौधरी, करण वाघरे, विलास महाजन, चंदन पाटील, सुरेश महाजन, दिलीप महाजन, बुट्या पाटील, तौसीफ पटेल, दिक्षा गायकवाड, यांसह पत्रकार राजेंद्र वाघ उपस्थित होते. उतारा वाटप कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन व ना.गुलाबराव पाटील, तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी सो, यांचे विशेष आभार रविंद्र कंखरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी नेहरु नगरातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.