धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक ; सुरेश नानांची मंत्री गुलाबराव पाटलांना Tough Fight
संपादकीय
धरणगाव – धरणगाव तालुक्याचे धुरंधर नेते म्हणून सुरेश नाना चौधरी यांचे नाव घेतले जाते. इतकेच नव्हे तर खुद्द मंत्री गुलाबराव पाटील यांना देखील घडविण्यात सुरेश चौधरी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे कुणीही नाकारू शकत नाही. यातच सद्ध्या झालेल्या धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत देखील सुरेश नानांनी आपली ताकद पणाला लावलेली पाहायला मिळाली. या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सुरेश नानांनी मंत्री गुलाबराव पाटलांना Tough Fight दिली असेच म्हणावे लागेल.
एकीकडे शिंदे गट, भाजप व राष्ट्रवादी गट यात मंत्री गुलाबराव पाटील, पिंप्री जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य पी.सी.पाटील, रणनितीकार चंद्रशेखर अत्तरदे, सहकार क्षेत्रातील जाणकार व अनुभवी संजय पवार तर दुसरीकडे महाविकास आघाडीत एकमेव सुरेश नाना चौधरी यांनी सर्वस्व पणाला लावल्याचे दिसून आले. वास्तविक महाविकास आघाडी यावेळी एकसंघ असल्याचे मात्र दिसून आले नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीच नव्हे तर ठाकरे गटात देखील दुफळी बघायला मिळाली. माघारीच्या दिवशी खुद्द पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी भेट देवून कार्यकर्त्यांशी हितगुज करीत माघारीसाठी कार्यकर्त्यांना आदेश दिलेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ मात्र दिवसभर दिसले नाही. इतकेच नव्हे तर माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी देखील पाहिजे तसे पाठबळ महाविकास आघाडीसाठी दिल्याचे दिसून आले नाही. यातूनच महाविकास आघाडीत सर्वच आलबेल असल्याचे वर वर जरी दिसत असले, तरी वास्तविकता मात्र वेगळीच होती. शिंदे गट व भाजप हि बाजी एकतर्फी जिंकेल अशी परिस्थिती प्राथमिकता दिसून येत होती.
वरील सर्व पार्श्वभूमी बघता सुरेश नाना विरुद्ध मंत्री गुलाबराव पाटील अशीच सरळ सरळ लढत दिसुन आली. सुरेश नाना ‘नको’ म्हणुन अनेकजण ‘शड्डू’ ठोकुन होते. शिवसेना शिंदे गटाने तर सुरेश नाना सोडुन कुणालाही मत द्या अशी आवईच उठविली होती. असे असतांना देखील सोसायटी गटातून सुरेश नानांना इतर सर्वांपेक्षा सर्वाधिक मते मिळून ते विजयी ठरले.
अश्या या चुरशीच्या निवडणुकीत सुरेश नानांनी मंत्री गुलाबराव पाटलांना Tough Fight दिली असेच म्हणावे लागेल.
शिंदे गट, भाजप व राष्ट्रवादी गट विरुद्ध महाविकास आघाडी यात शिंदे गटाला १२ तर महाविकास आघाडीला ६ जागांवर समाधान मानावे लागले असले तरी. सुरेश नानांनी दिलेल्या या Tough Fight ची चर्चा मात्र धरणगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.