धरणगाव चे प्रसिध्द चित्रकार सुपुत्र योगेश सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर…
धरणगावचे सुपुत्र तसेच खान्देशातील प्रसिध्द चित्रकार योगेशजी सुतार यांना महात्मा जोतीबा फुले जीवन गौरव सन्मान जाहीर जिल्ह्यात कमी वयात जीवनगौरव प्राप्त झालेले कला क्षेत्रातील व्यक्तीमहत्व.
२४ वर्षापासून शिक्षण, कला क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक उपक्रम, प्रशिक्षण शिबीर, चित्रकला विषयक मार्गदर्शन शिबीर राबविली म्हणून त्यांना हा सन्मान मिळाला आहे. राज्यस्तरीय पुरस्कारासाठीे नामांकन युवा सेना-मविसेचे प्रदेशाध्यक्ष भुषण सुर्यवंशी यांनी केले. तपशिल ज्युरी सदस्यांनी निवड केली तसेच पुरस्कार वितरण पुढील महिन्यात होणार आहे. नाशिक येथील पुरस्कार सोहळ्यात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
निर्वाण फाॅऊडेशनच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, कला क्षेत्रातील कार्यासाठी इंडिया बुक मध्ये नोंदणी असेल. शासकीय कार्यालयात महापुरुषांची चित्र स्मारकांची कामे केल्याची दखल घेत जिल्ह्यातून निवड करण्यात आली. त्यात योगेशजी सुतार यांचा समावेश झाला हे जळगावकरांसाठी अभिमानास्पद आहे. योगेशजी सुतार यांच्या चित्रप्रदर्शनाचे तसेच चित्रशैलीची विशेष लोकप्रियता असून खान्देशात तसेच राज्यातही त्यांच्या चित्रस्मारकांची मागणी आहे. राज्याबाहेरही त्यांनी चित्रांचे प्रदर्शन केले आहेत. प्रदर्शनातील कलाकृतीचे निरीक्षक म्हणुनही त्यांचे योगदान आहे. ऊत्स्फूर्तपणे कला जोपासत २ तप कला क्षेत्रात दिले तसेच विद्यार्थी घडवणारे सुतार यांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
त्यांनी पोलीस दलासाठी योगदान देताना गुन्हेगारांची रेखाचित्रे काढल्याने गुन्हेगाराची ओळख पटविण्यात खूपच मदत झाली आहे. जळगाव येथे चित्र प्रदर्शनात अनेक चित्रे असून ते रचनाचित्र अमूर्त शैलीतील चित्रे असून वेगवेगळ्या रंगसंगतीतील मनमोहक भावनांना हात घालणारी आहेत, सलाम त्यांच्या कल्पक कार्याला…