धरणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सारजाई कुडे व बालकवी विद्यालयाचा द्वितीय क्रमांक
धरणगाव – भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील स्कूल कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक आल्याने विद्यार्थी चि.यशोदीप मधुकर पालीवाल इयत्ता दहावी व विज्ञान शिक्षक वाय डी चिंचोरे यांचा गौरव जिल्हा परिषद चे सदस्य प्रतापरावजी पाटील व आपले धरणगावचे गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आला या विद्यार्थ्याने बनवलेलं स्मार्ट व्हेईकल या उपकरणाला ” द्वितीय” क्रमांकाने विजय होऊन जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पात्र झाला. त्याला मार्गदर्शन केले श्री वाय.डी चिंचोरे सर यांनी.त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटिया सचिव प्रा रमेश महाजन संचालक मंडळ माध्यमिक चे मुख्याध्यापक एस एस पाटील, प्राथमिकचे मुख्याध्यापक जीवन पाटील त्याचप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.