धरणगाव नगरपरिषदेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर व महास्वच्छता अभियानाचे आयोजन

धरणगांव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव नगरपरिषदेच्यावतीने “सेवा पंधरवडा” व “स्वच्छता ही सेवा – २०२५” या शासन उपक्रमांअंतर्गत नागरिकांच्या सहभागातून आणि शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी तर ‘महास्वच्छता अभियान’ दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर
दिनांक: २६ सप्टेंबर २०२५
स्थळ: नगरपरिषद कार्यालय, धरणगाव
वेळ: सायं ४.०० ते सायं. ५.००
या शिबिराचा उद्देश नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे. या शिबिरामध्ये खालील सेवा आणि माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे:
प्रमुख सेवा आणि लाभ:
अभय योजना व मालमत्ता कर आकारणी,
नवीन नळ कनेक्शन संयोजन,
प्रधानमंत्री स्वनिधी योजना,
प्रधानमंत्री आवास योजना,
आयुष्यमान भारत कार्ड वितरण
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना
यावेळी नागरिकांना योजनेची माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया व मार्गदर्शन केले जाईल.
प्रमुख वैशिष्ट्ये:
एकाच छतात खाली अनेक सेवा देण्यात येतील
नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल
महास्वच्छता अभियान
दिनांक: २७ सप्टेंबर २०२५
वेळ: सकाळी ७.०० वाजे पासून
स्थळ : संपूर्ण धरणगाव शहर – शाळा, सार्वजनिक जागा, रस्ते, बाजारपेठ, रुग्णालय परिसर इत्यादी
स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने, धरणगाव शहरात भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील सर्व शाळांतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग, नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, सामाजिक संस्था, नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकारी सक्रीय सहभाग नोंदवणार आहेत.
अभियानाचे वैशिष्ट्ये:
विद्यार्थी आणि नागरिकांकडून स्वच्छतेचे श्रमदान
जनजागृतीसाठी फेरी, पोस्टर प्रदर्शन, नारेलेखन
प्लास्टिक मुक्ती, कचरा वर्गीकरणाचे प्रात्यक्षिक
सार्वजनिक ठिकाणांवर विशेष स्वच्छता मोहीम
नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारी निर्माण करणे
प्रमुख उपस्थिती:
या दोन्ही उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गुलाबरावजी पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन होईल तसेच विविध योजनांचा शुभारंभ व लाभ वितरण देखील करण्यात येईल.
उद्दिष्ट व अपेक्षित परिणाम:
नागरिकांपर्यंत शासकीय सेवा सुलभपणे पोहोचवणे
योजना व सेवांबाबत जागृती निर्माण करणे
स्वच्छतेबाबत जनमानसात जागरूकता वाढवणे
लोकसहभागातून समाजात सकारात्मक बदल घडवणे
नागरिकांना आवाहन:
धरणगाव नगरपरिषदेच्यावतीने सर्व नागरिकांना, सामाजिक संस्थांना, शाळांना आणि स्थानिक स्वयंसेवी संघटनांना विनम्र आवाहन करण्यात येते की, या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे. आपला सहभाग या उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.