ताज्या बातम्या

धरणगाव नगराध्यक्षा यांनी केला यशवंतांचा सत्कार

तुमचं यश इतरांसाठी प्रेरणादायी – लिलाबाई चौधरी

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे

धरणगाव – तालुका व शहरातील निलेश चौधरी, कल्पेश महाजन, कल्पेश पाटील यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल लोकनियुक्त नगराध्यक्ष लिलाबाई चौधरी यांनी तिन्ही यशवंतांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, SSC GD मार्फत धरणगाव शहरातील निलेश चौधरी (CRPF – धरणगाव), कल्पेश महाजन (CISF – धानोरे), कल्पेश पाटील (BSF – आनोरे) यांची भारतीय सैन्य दलात विविध जागेवर निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल धरणगाव नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाबाई सुरेश चौधरी आणि नगरपरिषदेचे गटनेते निलेश सुरेश चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी लिलाताई यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तुमचं यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन याप्रसंगी लिलाताई यांनी केले. या सत्कार सोहळ्याप्रसंगी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे लक्ष्मण पाटील सर यांच्यासह उमेश चौधरी, राकेश चौधरी, अरविंद चौधरी, मनोज चौधरी, गोपाल चौधरी, गणेश चौधरी, जयेश चौधरी, कल्पेश महाजन, महेश पाटील, भोजराज चौधरी, आकाश धनगर आदी मान्यवर उपस्थित होते. तिन्ही यशवंत विद्यार्थांना शहर व तालुक्यातील अनेक नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *