धरणगाव येथे महाराणा प्रताप सिंह प्रवेशद्वार होणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील
प्रतिनिधी (अजय बाविस्कर)
धरणगाव – येथील अमळनेर रोडवर महाराणा प्रताप चौफुलीच्या पुढे भव्य असं महाराणा प्रताप सिंह प्रवेशद्वार तातडीने करणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल धरणगाव येथे एका कार्यक्रमात केली.यापूर्वी राजपूत समाज मंगल कार्यालयासाठी निधी पालकमंत्री पाटील यांनी उपलब्ध करून दिला आहे.आता महाराणा प्रताप सिंह प्रवेशद्वार करणार असल्याने धरणगाव तालुक्यातील, शहरातील राजपूत समाजाने पालकमंत्री पाटील यांचे ऋण व्यक्त केले आहे. धरणगाव शहरात यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ,महात्मा फुले प्रवेशद्वार,संताजी जगनाडे महाराज प्रवेशद्वार झालेले असून आता महाराणा प्रताप सिंह प्रवेशद्वार होणार असल्याने सकल शहरवासीयांना आनंद झालेला आहे.पालकमंत्री पाटील यांनी घोषणा केल्यानंतर राजपूत समाजाचे अध्यक्ष जीवनसिंह बयस,कल्याने होळ चे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष (अजित पवार गट) रमेश बापू पाटील,धीरेंद्र पुर्भे, बजरंग दलाचे नेते प्रथम सिंह सूर्यवंशी, समाजाचे सचिव गणेश सिंह सूर्यवंशी, कडूसिंह बायस ,शिरीष बायस, सतीश सिंह जनकवार ,प्रल्हाद सिंह चव्हाण, गोपाल सिंह बायस,गोपाल सिंह जनकवार यांच्यासह समाजातल्या अनेक मान्यवरांनी पालकमंत्री पाटील यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.लवकरच या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन समारंभ आणि राजपूत समाज मंगल कार्यालयाच्या डोमचा लोकार्पण समारंभ होणार असल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष जीवनसिंह बायस यांनी दिली आहे.