धरणगाव येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जोरदार शक्तिप्रदर्शन…! बुथ कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा मेळावा उत्साहात
धरणगाव प्रतिनिधी – विनोद रोकडे
धरणगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणगावात नुकतेच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जळगाव ग्रामीण मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
धरणगाव शहरातील जी.एस.ट्रेडर्स (चोपडा रोड) आयोजित मेळाव्याला सुरूवात करण्यापूर्वी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष छबुराव नागरे, निरीक्षक भास्करराव काळे आदी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना माल्यार्पण केले. त्यानंतर ग्रामीण रूग्णालयापासून थेट मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी सर यांनी प्रास्ताविकात मेळाव्याच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील तसेच प्रा.एन.डी.पाटील सर, मोहन पाटील सर, लक्ष्मण पाटील सर, अर्जून पाटील (बाबा), नईम काझी, रवींद्र पाटील, सुभाष पाटील, दीपक वाघमारे यांनीही आपल्या मनोगतातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा सादर केला. तसेच जळगाव ग्रामीणच्या विकासासाठी तुतारी चिन्हावर श्री.देवकर यांना निवडून आणण्याचे भावनिक आवाहन केले. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष छबुराव नागरे यांनी तसेच थर्ड आय ॲडव्होकेसीचे अध्यक्ष गणेश आष्टेकर यांनीही मार्गदर्शन केले. जळगाव ग्रामीणची जागा गुलाबराव देवकर हे तुतारी चिन्हावरच लढतील आणि मोठ्या मताधिक्याने जिंकतील सुद्धा, असा विश्वास पक्षाचे निरीक्षक भास्करराव काळे यांनी व्यक्त केला.
गुलाबराव देवकरांनी जळगाव ग्रामीणच्या विकासासाठी घातली साद
बूथ कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव ग्रामीणच्या सर्वांगिण विकासासाठी यावेळी पुन्हा संधी देण्याचे भावनिक आवाहन केले. आपल्या कार्यकाळातील विकासाची भरीव कामे आणि विद्यमान मंत्र्यांच्या काळातील निकृष्ठ कामे, यांचा तुलनात्मक आढावा देखील श्री.देवकर यांनी मांडला. प्रसंगी जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनीही जळगाव ग्रामीणच्या विकासासाठी गुलाबराव देवकरांना साथ देण्याचे आवाहन केले. मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील सर यांनी केले तर तालुकाध्यक्ष धनराज माळी सर यांनी आभार मानले.
‘यांची’ होती मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थिती
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, धरणगाव बाजार समितीचे संचालक रवींद्र पाटील, दिलीप आण्णा धनगर, रघुनाथ पाटील, रंगराव पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अशोक सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, धरणगाव कार्याध्यक्ष अरविंद देवरे, ओबीसी सेलचे अनिल पाटील, कृषीभूषण शरद पाटील, वैद्यकीय आघाडीचे डॉ.नितीन पाटील, डॉ.विलास चव्हाण, सतखेड्याचे सरपंच किरण पाटील, निंभोरा येथील रोहिदास पाटील, नारायण चौधरी, राजू पवार (पिंपळेसीम), अर्जून पाटील (टहाकळी), बापू मोरे, मोहन बाविस्कर (साळवा), संजय पाटील (पिंपळे),भूषण पाटील, किरण पाटील (भवरखेडे), भाऊसाहेब पाटील (साकरे), गोपाल पाटील, भगवान शिंदे, रघुनाना मराठे, जानकीराम पाटील, संजय पाटील (भोणे), किशोर पाटील (बोरगाव), हितेंद्र पाटील (बांभोरी), राजेश अत्तरदे, आर.आर.अत्तरदे, मनोज पाटील, किशोर बऱ्हाटे, बाबासाहेब पाटील, किरण नेहते, अमोल हरपे, सिताराम मराठे, ॲड. कैलास मराठे, अमित शिंदे, ॲड. सागर वाजपाई, राहुल पाटील, सागर महाले, रामकृष्ण (वासू) मराठे, समाधान पाटील, रमेश महाजन, खलील खान, रमजान शाह, साजिद कुरेशी, प्रफुल्ल पवार, सागर चव्हाण, रवि महाजन, बालाजी महाजन, सुमित भोई, प्रकाश भोई, लहू महाजन, प्रल्हाद माळी, परेश गुजर, कादीर खान, अकिल मिस्तरी, बंडू काटे, उत्तम भदाणे, महेंद्र महाजन, विलास नन्नवरे, बंटी शिंदे, गोपाल माळी, गोविंदा पाटील, विश्वास पाटील, नगर मोमीन, राकेश बोरसे, दिलीप पाटील, सुभाष पाटील, रवींद्र कोळी, शशिकांत पवार, भुवनेश सोनवणे, निखिल पाटील, विलास वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.