ताज्या बातम्या

धरणगाव येथे संत गजानन महाराज पालखीचे स्वागत

प्रतिनिधी:अजय बाविस्कर

धरणगाव अमळनेर ते शेगाव संत गजानन महाराज पायी पालखीचे भव्य स्वागत अनिता नगर धरणगाव येथे करण्यात आले .वारकरी सह आलेल्या पालखीचे हेम इंदू नगर मधून विद्युत नगर,अनिता नगर मध्ये मिरवणूक काढण्यात आली.अनिता नगर मधील ग्रामविस्तार अधिकारी शरद पाटील ,सौ वैशाली पाटील यांनी पालखीचे विधिवत पूजन केले. मिरवणुकीत हेम इंदू नगर,विद्युत नगर,अनिता नगर मधील भाविक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या सात वर्षांपासून या. पालखीचे अनिता नगर वासिय स्वागत करीत आहेत.अमळनेर ते शेगाव पालखीचे नियोजन ,पालखी सोहळ्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील,विठ्ठल पाटील (माऊली), योगेश बाग,डहाळे सर, जी एम पवार , संदीप महाजन आदीं करीत असतात.पालखीच्या आगमनानंतर गजानन महाराज यांच्या नावाने सत्संग करण्यात आले.पालखीच्या आगमनाने सर्व परिसरात भक्तिमय वातावरण होते.दुपारी भोजन विश्रांती नंतर वारकरी पालखी सह पिंपरी कडे मार्गस्थ झाले.पालखीच्या स्वागत समारंभासाठी शरद पाटील,पंजाबराव पाटील,अनिल पाटील ,प्रा एम यू पाटील,शिवाजी गुरुजी आदींनी परिश्रम घेतले यावेळी एरंडोल चे गटविकास अधिकारी दादाजी जाधव,धरणगाव चे गटविकास अधिकारी अजित पवार , डॉ हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे सरपंच सौ सविता सोनवणे यांच्यासह कॉलनी वासीय उपस्थित होते.वारकऱ्यांनी गायिलेल्या भजन,गवळणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *