धरणगाव रथोत्सवात 225 रुग्णांची नेत्रतपासणी

धरणगाव वार्ताहर / विनोद रोकडे
धरणगांव – येथील श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळातर्फे खास रथोत्सवानिमीत्त धरणगाव डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील सुप्रसिद्ध नेत्रायु हॉस्पीटलच्या सहकार्याने वाणी मंगल कार्यालयात मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीरात शहर व तालुक्यातील २२५ गरजू रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. सुप्रसिद्ध आयुर्वेदगुरु व नेत्रायु हॉस्पीटरचे डॉ. हेमकांत बाविस्कर व त्यांच्या चमूने रुग्णांचे डोळे तपासून अवश्यक ते उपाय व औषधोपचार दिला.
या नेत्रतपासणी शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री मा.ना.श्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद डहाळे, मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुधाकर वाणी, डॉ हेमकांत बाविस्कर व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष श्री. डी आर पाटील सर, कार्याध्यक्ष श्री जीवनसिंह बयस इ. उपस्थित होते. मान्यवरांच्या स्वागतानंतर मा. पालकमंत्री महोदयांनी जीवन जगण्यासाठी दृष्टी किती महत्वाची हे सांगून डॉ. हेमकांत बाविस्कर यांच्या कामाचा गौरव केला व शिबिराला शुभेच्छा देवून श्री बालाजी मंडळ, डॉक्टर व मेडीकल असोसिएशनने हा सामाजिक व आवश्यक उपक्रम राबवल्याबद्दल धन्यवाद दिले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री डॉ मिलिंद डहाळे, डॉ पंकज अमृतकर, डॉ. मनोज अमृतकर, सुधाकरशेठ वाणी, डॉ शैलेंद्र सूर्यवंशी, डॉ. सुचित जैन, मनीष लाड, छोटू जाधव, महेश अमृतकर, व्यवस्थापक मंडळाचे स्वयंसेवक जिग्नेश बयस, मनीष बयस, ज्ञानेश्वर बिरारी, सागर बयस, सतीश बयस यांनी सहकार्य केले. तर डॉ. हेमकांत बाविस्कर यांच्या चमूतील डॉ अनुपम, डॉ भाग्यश्री, डॉ किरण जाधव व डॉ. जतिन बाविस्कर यांनी यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.