धरणगाव रेल्वे स्टेशन विकास व गाड्यांच्या थांब्याबाबत मागण्या

धरणगांव – डीआरयूसीसी सदस्य (पश्चिम रेल्वे) तसेच धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी यांनी,माननीय खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, पश्चिम रेल्वे मुख्यालयात मुख्य वाणिज्य प्रबंधक स्वप्नील वालिंजकर तसेच विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन धरणगाव रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत वाणिज्य व परिचालक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. सर्व मागण्यांवर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
🔹 धरणगाव येथे खालील गाड्यांना थांबा देण्यात यावा:
- 19559/60 ओखा – तिरुपती
(नियमित सेवा सुरू होत आहे) - 20625/26 चेन्नई – भगत की कोठी एक्सप्रेस
- 06181 कोयंबतूर – जयपूर स्पेशल
- 09065/66 सूरत – छपरा स्पेशल
- 09031/32 उधना – हसनपूर स्पेशल
- 19105/06 उधना भुसावळ मेमो ला भोणे स्टेशन ला थांबा
🔹 खालील गाडी पुन्हा सुरू करण्यात यावी:
- 07061/62 हैदराबाद – भावनगर स्पेशल (पालीताना यात्रेसाठी अत्यंत उपयुक्त व यशस्वी)
- 09059/60 उधना खुर्दा रोड स्पेशल ट्रेन
🔹 धरणगाव स्टेशनवरील सुविधा:
- नवीन तिकीट इमारतीजवळ फूट ओव्हर ब्रिज (FOB) बांधण्यात यावा
- आरपीएफ (RPF) कार्यालय सुरू करण्यात यावे
🔹 डब्यांची वाढ (Coach Augmentation):
- 20925/26 अमरावती एक्सप्रेसमध्ये 5 डबे वाढवावेत किंवा 20 LHB डब्यांसह चालवावी
- 19005/06 मध्ये 3 अतिरिक्त डबे जोडावेत
निष्कर्ष:
धरणगाव स्टेशनच्या विकासासाठी व प्रवासी सुविधांसाठी सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच या सर्व मागण्यांवर कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.


