धरणगाव शहरमहाराष्ट्र

 धरणगाव श्रीबालाजी रथवहनोत्सव उत्साहात संपन्न !

धरणगाव – कोरोना काळातील अनुशेष १५ दिवसात भाविकांनी भरून काढला धरणगाव येथील श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचा शेकडो वर्षा पासून सुरु असलेला पारंपारीक रथवहनोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. घट स्थापने पासून सतत १५ दिवस चालणारा उत्सवाची काल रात्री १.३० वा. श्रीबालाजी भगवानांच्या आरतीने सांगता झाली. या १५ दिवसात दररोज किमान १०.००० , मारुतीच्या वहनाला ७०,००० तर रथाच्या दिवशी १ लाख असे एकूण जवळजवळ ३ लाख लोकांनी श्रीबालाजी भगवानांचे दर्शन घेवून उत्सवात हजेरी लावली.

            कोरोना काळात २ वर्ष मिरवणुकांमध्ये खंड पडला होता. हा मिरवणुकांचा अनुशेष लेझीमपथक व भाविकांनी जल्लोशपूर्ण वातावरणात भरून काढला. मिरवणूकीच्या दररोजच्या मार्गावरील झाड, लाईट व मुरुमची व्यवस्था नगरपालिका प्रशासनाने प्रशासक श्री. जनार्दन पवार व संजय मिसर यांच्या कुशल नियोजनाने तर विद्युत मंडळाचे अभियंता श्री धोटे यांच्या सुचने नुसार वायरमन श्री दिलीप महाजन, तडवी, बडगुजर व राहुल चौधरी यांनी चोख सेवा दिली. पोलीस इन्स्पेक्टर श्री राहुल खताळ, एपीआय श्री गुंजाळ व श्री पवार, पो कॉ वैभव बाविस्कर, मिलींद सोनार यांनी आपल्या स्टाफच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्थेचे सर्व नियम व भाविकांच्या उत्साहाची योग्य सांगड घालून पोलीस प्रशासनातील माणूसकीचे व जनतेच्या भावनांची कदर करण्याचे उदाहरण घालून दिले. पोलीस प्रशासन व जनता यात उत्तमरीत्या संवाद साधुन आपल्या कौशल्याचा परीचय श्री खताळ यांनी दिला.

              दररोजचे वहन शहरातील प्रत्येक गल्लीतून जाईल, वेगवेगळ्या वहनावर श्री बालाजी भगवान विराजमान करून प्रत्येक गल्लीतील भाविकाला दर्शन घेता येईल असे सूत्रपद्धतीने नियोजन करण्याचे कसब पूर्वजांनी केले आहे. १९०० साली सुरु झालेलो हा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहे. दिवसभर शेतात व इतरत्र मोलमजुरी करणारा तरुणवर्ग सतत १५ दिवस लेझीमपथकात सहभागी होतो.मा.सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळत आपल्या उत्साहाला, जल्लोषाला आवर ही तेवढ्याच तत्परतेने घालतो, वहनाला लागणाऱ्या बैलजोडीसाठी लिलाव केला जातो, यांत, सर्वाधिक बोली बोलणाऱ्या भाविकास जोडी जुंपण्याचा मान मिळतो. बोलीतील रक्कम तो मंडळाला देतो याशिवाय लेझीमपथकांना बक्षिसाची रोख रक्कम, बैलजोडीची सजावट, मित्रमंडळीस घरी जेवण, गुलाल, फुलांच्या पाकळ्या, फोटो, वाजंत्री इ.साठी पैसे खर्च करतो व आपला नवस श्रीबालाजी चरणी अर्पण करून आनंद मिळवतो हे वहन प्रत्येक गल्लीतून जात असताना प्रत्येक घरातून नारळांचे/फुलांचे हार चढवून आरती दिली जाते.. ठिकठिकाणी चहापानाची व्यवस्था केली जाते. रथोत्सवाच्या दिवशी केळी व साबुदाणा खिचडी वाटप केली जाते.

              कोरोना काळात मंदिरातच दररोज च्या वहनांची मांडणी करून रोजच्या आरतीला गांवातील प्रत्येक समाजाच्या पंचमंडळीला पाचारण करून सामाजिक समरसतेचा एक अनोखा अनुभव मंडळाने दिला होता, या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम यावर्षी अनुभवायला मिळाला गांवातील बालगोपाल मंडळी कल्पकतेने व कलाकुसरीने वहनाची गाडी वहन, विद्युतव्यवस्था, कवी प्रदीप यांची समाजाचे यथार्थ वर्णन करणारी जुनी गाणी इ. चे सादरीकरण करून ही परंपरा आम्ही पुढे यशस्वी चालवू याची जणुकाय ग्वाही देतात.या सर्व बालगोपालांच्या वहनांचे प्रदर्शन भरवून या चिमुकल्यांना गौरवपत्र व पेन देवून मंडळातर्फे गौरविण्यात आले प्रत्येक गल्लीत सडा घालुन, आकर्षक व सामाजिक सद्यस्थितीचे भान ठेवून काढलेल्या रांगोळ्या महिलावर्गाच्या उत्साहाचे प्रतिक आहे, तर या सर्व मंडळीचे कौतुक करण्यासाठी गावातील कर्तव्य बहुउद्देशीय संस्था, मुन्नादेवी अँन्ड मंगला देवी फांऊडेशन, जगदीश चौधरी, गोटू काबरा, दत्तूनाना चौधरी, जीवन बयस इ. अनेक संस्थांचे योगदान महत्वपूर्ण ठरते.

          वहनाच्या मिरवणुकीची रात्रभर सुरक्षितता सांभाळणारे पोलीस व होमगार्डस यांच्यासोबत मंडळाचे पदाधिकारी, सर्व विश्वस्त, भालदार / चोपदार, कानगीवाले, १९८६ साली मंडळाने घेतलेल्या जनरेटरची देखभाल करण्यासाठी स्वत: दररोज उपस्थित रहाणारे मंडळाचे विश्वस्त सुरेश भागवत, मधुकर शिरसाठ, गणेश पुरभे तर प्रकाश व ध्वनी व्यवस्था सांभाळणारे भावडू मराठे, संजय चौधरी, मंदिराचे पुजारी गणेश व र्सो उज्वला पुराणीक इ. चे सहकार्य या उत्सवाच्या यशस्वीतेत आहे. सर्व देणगीदार बैलजोडीधारक, पत्रकार व प्रेस मिडीया इ. शिवाय हा उत्सव पूर्ण होवूच शकत नाही या सर्व मंडळीचे व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष दिलीप रामू पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव बाघ, कार्याध्यक्ष जीवनसिंह बयस, प्रभारी सचिव प्रशांतवाणी, सहसचिव अशोक येवले, खजिनदार किरण वाणी इ.नी आभार व्यक्त केले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ना श्री गुलाबराव पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, खासदार उन्मेशदादा पाटील, आमदार चंदूभाई पटेल, माजी आमदार स्मिताताई वाघ, माजी पालकमंत्री श्री गुलाबराव देवकर, जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे, मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र महाले, तालुक्यातील सर्व अधिकारी यांची उपस्थिती भाविकांचा उत्साह वाढविणारी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *