धरणगाव : सी.बी.एस.ई. परीक्षेत लिटिल ब्लॉसम स्कूलचे घवघवीत यश
पहिल्याच वर्षी 10 वीचा 95% निकाल
धरणगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील पहिलीच सी.बी.एस.ई.शाळा म्हणून नाव लवकिक प्राप्त असलेल्या लिटिल ब्लॉसम स्कूलच्या ई.10वी च्या पहिल्या बॅच चा 95%निकाल लागला असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…
शाळेच्या ई.10 वी चे हे पहिलेच वर्ष होते.त्यात जवळ पास 15 विद्यार्थ्यांचा सहभाग होता..त्यापैकी तालुक्यात प्रथम पुष्कर पाटील 92.17%. , द्वितीय लक्ष बहपाई 81.17%. , तृतीय काफिया शेख 77.00% मिळवून यशस्वी झाले.इतर सर्वच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता पूर्ण टक्केवारी मिळवून शाळेसाठी यशाचा शुभारंभ करून दिला..त्याबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ई .10 वी च्या गुणवत्ता वाढ व विकासासाठी शाळेचे प्राचार्य , तज्ञ मार्गदर्शक ,सर्व शिक्षक ,इतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थी व शाळेच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे चेअरमन दीपक जाधव , प्राचार्य सौ. ज्योति जाधव ,संचालक तस्लिमा बोहरी , ए .के पाटील सर , गजानन साठे साहेब , सर्व शिक्षक ,इतर कर्मचारी , पालकांनी अभिनंदन केले.