नांदगाव-आनंद नगर भागात दुषित पाणी पुरवठा ; नागरिकांनी आक्रोश करीत नांदगांव पालिकेवर काढला मोर्चा
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
नांदगांव शहरास आज आनंदवाडी या ठिकाणी दूषित पाणीपुरवठा करण्यात आला. याचा संताप अनावर झाल्याने येथील, पुरुष महिला यांनी, छत्रपती संभाजी नगर रोड मार्ग डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा फुलै चौक कालिका चौक या मार्ग, नांदगांव नगर परिषद वर धडक मोर्चा नेण्यात आला ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
यावेळी संतप्त महिलांनी पालिकेच्या समोर जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे, धिंडोडे काढले .जोपर्यंत आम्हाला शुद्ध पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी प्रशासनाची धावपऴ उडाली.
प्रशासनाने आंदोलन कर्त्या महिलांशी संवाद साधला व आज सायंकाळी तुम्हाला शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. यावेऴी, आंदोलक सामाजिक कार्यकरत्या अॅड विद्या कसबे, सचिन साऴवे, कांग्रेस चे शहर अध्यक्ष मनोज चोपड़े माझी नगर सेविका अक्का बाई सोनवणे,शोभा देवकांते , शोभा पगारे, कमल आहिरे, दिपक अंभोरे विश्वास आहिरे, अनिल जाधव, नितिन जाधव अरुण साऴवे असंख्य महिला माझी नगर सेवक यांनी, आंदोलन त भाग घेतला. नांदगांव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी चौंक बंदोबस्त ठेवला.