महाराष्ट्र

नांदेड : कुंटूर येथे २४ डिसेंबर २०२३ रोजी संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन

प्रतिनिधि – शंकर अडकिने

नांदेड – भारतीय संविधानाने देशातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना हक्क व अधिकार दिले असून या संविधानाचे जन माणसाना अजूनही जाणिव नाही यासाठी संविधान जागृती व्हावी यासाठी कुंटूर येथे २४ डिसेंबर २०२३ रोजी संविधान जागृती महोत्सव समितीच्या वतीने संविधान जागृती महोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून जनमानसात भारतीय संविधान व आपले हक्क आणि कर्तव्य याबद्दल अनेकांना जानिव नसल्याने अशा नागरिकांची जागृती व्हावी या उद्देशाने संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमास सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी व संविधान प्रेमी जणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संविधान समिती कुंटूर सर्कलच्या वतीने करण्यात आले आहे.
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या संविधान जागृती महोत्सव सोहळ्याला नायगाव चे तहसीलदार श्रीमती मंजुषा भगत यांच्या अध्यक्षतेखाली संविधानावर प्रबोधनात्मक ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर , जेष्ठ विचारवंत अँड.विजय गोणारकर ,पोलीस संरक्षक हक्क संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोदअण्णा भोसले ,के.के.मास्टर औरंगाबाद यांचे संविधानावर सखोल असे व्याख्यान होणार असून व्यासपीठावर गट विकास अधिकारी लक्ष्मण वाजे, जयप्रकाश गुठे पोनि.नयगाव, रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी संकेत दिघे,पोलीस उपनिरीक्षक संजय अटकोरे ,पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे ,नायगाव पंचायत समितीचे केंद्र प्रमुख मंगेश हनवटे ,दतात्र्य आईलवार सरपंच सुजलेगाव ,युवा उद्योजक कैलास बोंडले आदीप्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे होणाऱ्या संविधान जागृती सोहळ्याची दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता कुंटूर येथील पोलीस ठाण्यापासून संविधान रॅलीचे उदघाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्या हस्ते होऊन रॅलीत तिरंगा झेंडा हाती घेऊन, संविधानाच्या प्रतीची व संविधानाला अभिप्रेत घोषणा देत प्रमुख रस्त्याने रॅली जिल्हा परिषद हायस्कूल येथे नियोजित कार्येक्रस्थळी पोहोचेल लागलीच पुढील कार्यक्रम ११ वाजता सुरुवात होऊन २ वाजजे पर्यंत कार्यक्रम सुरू राहील.

■ राजकिय पक्षाचा नाही…
संविधान जनजागृती महोत्सव कार्यक्रम कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही एका जाती धर्माचा नसून तो देशाच्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी असलेल्या संविधानाचा कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही पक्षाचा ध्वज न आनता देशाचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आणावा असे आवाहन संविधान जागृती महोत्सव सोहळा समिती कुंटूर सर्कल च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *