नांदेड – देगलूर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा.उत्तमकुमार काबंळे यांची नियुक्ती
प्रतिनिधी – भीमराव दिपके, देगलूर, नांदेड जिल्हा
देगलूर : येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य पदावर प्रा.उत्तमकुमार काबंळे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रा.काबंळे हे विज्ञान विभागातील रसायनशास्त्राचे जेष्ठ अध्यापक आहेत सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना क.म.उपप्राचार्य पदाचे नियुक्तीपत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ यांनी दिले. आज रोजी प्रा काबंळे यांनी क.म. उपप्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी प्राचार्य डॉ.मोहन खताळ पर्यवेक्षक प्रा एस एन पाटील शिक्षण विस्तार अधिकारी हमीद दौलताबादी सह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.नियुक्ती बद्दल अ व्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.प्रकाश पाटील बेबंरेकर उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे सचिव मा.शशीकांत चिद्रावार सहसचिव सूर्यकांतराव नारलावार कोषाध्यक्ष विलासशेठ तोटावार कार्यकारिणी सदस्य राजकुमार महाजन, देवेंद्रशेठ मोतेवार, गंगाधरराव जोशी डाॅ कर्मवीर उन्नग्रतवार, रविंद्र अप्पा द्याडे जनार्दन शेठ चिद्रावार, चद्रकांत नारलावार आदी अभिनंदन केले आहे.