नांदेड : नायगाव पंचायत समितीतील रिक्त असणारी पदे तात्काळ भरा
वसंत सुगावे पाटील यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी
लोकनायक प्रतिनिधी : शंकर अडकिने नायगाव जिल्हा नांदेड
नायगाव :- पंचायत समिती मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असून ही पदे तात्काळ भरावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे केली आहे.
यामध्ये विस्तार अधिकारी(पंचायत-2) ,विस्तार अधिकारी(कृषी-2),साह्यायक लेखाधिकारी(1),कनिष्ठ लेखाधिकारी(1),सहाय्यक गटविकास अधिकारी(1),वरिष्ठ सहाय्यक(1) आदी पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे इतर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामांचा अतिरिक्त भार पडत आहे. यामुळे प्रशासकीय कामकाज वेळेवर होत नसून कामांना विलंब होत आहे. तसेच तालुक्यातील अनेक ग्रामसेवकांकडे 5- 7 गावांचा पदभार आहे.त्यामुळे अधिक ग्रामसेवकांची गरज असून ग्रामसेवक भरती ही करण्यात यावी.
पदसंख्या कमी असल्यामुळे कामे जलदगतीने होत नाहीत याचा त्रास सामान्य नागरिकांसह, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ,कर्मचारी यांना होत आहे. नायगाव तालुका हा जिल्ह्यातील मोठा व प्रमुख तालुका असून याठिकाणी रिक्त असलेली पदे तात्काळ भरावीत अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी केली.यावेळी घुंगराळा सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन श्यामराव यमलवाड उपस्थित होते.