नाशिक-ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव डवले व मुख्य कार्यकारी अधिकारी अस्मिता मित्तल यांची दहिवड गावाला भेट
लोकनायक न्युज प्रतिनिधि आदिनाथ ठाकूर, देवळा
देवळा – महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव मा.श्री एकनाथजी डवले सर यांनी ग्रामपंचायत-दहिवड तालुका देवळा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मिशन भागीरथी प्रयास अभियानाद्वारे सिमेंट प्लग बंधारे कामांची पाहणी केली असता त्याप्रसंगी प्रमुख उपस्थित मा.आसिमा मित्तल मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नाशिक व मा.डॉ.अर्जुन गुंडे सर अति.मु.का.जि.प.नाशिक व मा.रवींद्रजी परदेशी सर उप.मु.का.अ.साप्रवि तसेच मा.डॉ.वर्षा फडोळ मॅडम उप.मु.का.अ.ग्रा.प जि.प.नाशिक व मा.सुर्यवंशी सर जिल्हा जलसंधारण अधिकारी जि.प.नाशिक/शशिकांत वाघ उपअभियंता लघु पाटबंधारे विभाग देवळा-सटाणा तसेच राजेश देशमुख गटविकास अधिकारी प.स.देवळा व पवन पवार/गौरव जाधव शाखा अभियंता लपा विभाग देवळा व मगर साहेब कृषी अधिकारी प.स. देवळा तसेच रोहयो तालुका टिम व तालुका स्तरावरील सर्व खाते प्रमुख व पं.स.अधिकारी/कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी/ग्राम रोजगार सेवक/ग्रा.प.सदस्य व ग्रा.प.कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ/शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.