ताज्या बातम्या
नाशिक-दहिवड येथील देवरे विद्यालयात पालक शिक्षक मेळावा संपन्न
दहिवड प्रतिनिधी - आदिनाथ ठाकूर
देवळा – तालुक्यातील कै लक्ष्मीबाई देवरे विद्यालय दहिवड प्रांगणात आज शनिवार रोजी सकाळी 10 वा. शालेय विद्यार्थ्यांचे पालकांशी शैक्षणिक प्रगती विषयी पालक मेळावा घेण्यात आला.
कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी माजी लोकनियुक्त सरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदिनाथ ठाकुर यांना नियुक्त करण्यात आले कार्यक्रमास उपसरपंच राजाराम ठाकरे ग्रा प सदस्य दिगंबर पवार ग्रा प सदस्य सुनील अहिरराव जेष्ठ नागरिक श्रावण पवार प्रहार शेतकरी संघटना देवळा तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर माजी शिक्षक विश्वनाथ सोनवणे कॄष्णा पवार शरद अहिरराव राहूल सोनवणे समाधान अहिरे व कै ल देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एन आर चव्हाण तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन जाधव सर, महिरे सर यांनी केले.