निलंगा डीवायएसपी विशाल दुमे यांनी केली शेडोळ येथे अतिवृष्टीची पाहणी

प्रतिनिधी / जिवन जाधव
निलंगा येथे नव्यानेच रुजु झालेले डी वाय एस पी विशाल दुमे यांनी शेडोळ येथे अतिवृष्टी व ढगफुटी सद्रश पाउस झाल्याने शेतीपिक व पडझड झालेल्या घराची ,पाहणी केली शेडोळ ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन शेतकऱ्यांना आधार देत धीर देऊन शेती पिकांची नुकसानीची पाहणी केली शेतकर्यांनी खचुन जाउ नये येणाऱ्या अडचणीला सामोरे जावे व कांहीं आडचन भासल्यास त्वरित संपर्क साधून त्या अडचणी चे समाधान करण्याचे आश्वासन देऊन धीर दिला.
यावेळी उपस्थित शेडोळ येथील मान्यवर सरपंच स्वरूप विठलराव धुमाळ, उपसरपंच विशाल धुमाळ, गुणवंत जाधव, तंटा मुक्ती अध्यक्ष शंकर धुमाळ, तलाठी डिगंबर वाघे, विठल धुमाळ, बाब्रुवान हजारे, माधव पाटील, राहुल पाटील, संजय सावकार, नरसींग धुमाळ, शिवराज ठमके, श्रीमंत जाधव, सचिन धुमाळ, सुदाम आवले, बालाजी श्रीरसागर, बाबुलाल पठाण, प्रा.सतीश गुरुजी, धुमाळ वैभव धुमाळ, सचिन शिंदे, किरण धुमाळ, काका धुमाळ सह शेतकरी व शेडोळ ग्रामस्थ उपस्थित होते.