पावसाळ्यात विषारी सापापासून शेतकऱ्यांनी राहावे सावधान
बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाळा सुरु झाला व पेरणीसाठी शेतकरी राजा आपल्या काळ्या आईच्या कुशीमध्ये बीज पेरणी करत आहे पावसाचा जोर वाढल्यामुळे सापाच्या बिळात पाणी शिरल्यामुळे ते सुरक्षित स्थळी आश्रय घेतात मग ते शेत शिवार असो की कुणाचे घर साप विषारी असो की किंवा बिनविषारी तो दिसताच नागरिक भयभीत होतात व त्याला ठार मारतात आपल्या जिल्ह्यात विषारी सापाच्या मुख्य चार जाती आढळतात त्यात नाग, मण्यार, फुरसे, घोणस, तर बिनविषारी मध्ये अजगर, धामण, तस्कर, नाणेटी, डुरक्याघोणस, कुकरी धुळनागीन, कवड्या, दिवड, रुका, गवत्या, मांडूळ, या जातीचा समावेश आहे सापाच्या मिलनाचा काळ मार्च -एप्रिल हे दोन महिने असतो मे महिन्यात साप अंडी घालतो 50ते 60 दिवसात म्हणजेच जून -जुलै या महिन्यात पिल्ले बाहेर येतात तसेच काही प्रजातीचे साप म्हणजे घोणस, फुरसे पिल्याना जन्म देतात पिल्याची संख्या ३० ते ८० इतकी असते तसेच पावसाळी महिन्यात सर्वत्र निसर्ग बहरलेला असल्यामुळे या काळात बहूतांशी साप जास्ती च्या प्रमाणात पाहायला मिळतात निसर्गाचा समतोल व जीवन चक्र राखण्यासाठी साप व प्रत्येक वन्यजीव वाचविणे गरजेचे आहे साप आपल्या आजू बाजू च्या परिसरात घरात आढळून आल्यास काय करावे तसेच साप दिसल्यास स्वतः पकडण्याचे धाडस करू नये जीवावर हि बेतू शकते आपल्या घरा शेजारी साप दिसल्यास त्या सापा वर लक्ष ठेवून सर्पमित्र शिरूरकर ग्रुपशी संपर्क साधावा.सर्पदंश झाल्यास काय करावे. एखाद्या व्यक्तिला सर्पदंश झाल्यास जखम स्वच्छ पाण्याने धुवावी तसेंच ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला आहे त्याला लवकरात लवकर जिल्हा रुग्णालयात न्यावे ज्या ठिकाणी सर्पदंश झाला आहे त्या अवयवाची जास्त हालचाल करू नये व विष हे तंत्र -मंत्राने उतरत नाही त्यामुळे कोणत्या हि मंदिरात भोंदू बाबाकडे नेऊ नये याने सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या जीवाला धोका वाढू शकतो.सर्पमित्र शिरूरकर ग्रुप ने आता पर्यंत चाळीस हजार साप व मोर, हरीण, घोरपड, उदमांजर, अश्या अनेक वन्यजीव पशु प्राणी वाचवण्याचे काम गेल्या 12 वर्ष्यापासून करत आहे त्यात सर्पमित्र अमोल शिरूरकर, गोरख खेडकर, दयानंद हाक्के, अशोक कांबळे, दत्ता कोंपलवाड, गणेश बुलबुले हे सर्व सर्पमित्र निशुल्क वन्यजीव वाचवण्याचं काम दिवस रात्र करत असतात. आपल्या परिसरात साप अथवा जखमी पशु प्राणी आढळून आल्यास न मारता न घाबरता सर्पमित्र शिरूरकर ग्रुप च्या हेल्पलाईन क्र:-7709779798 या वर संपर्क साधावा 24 तास सेवा