पिक पाहणी लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून २०० रू लाचेची मागणी केली म्हणून कोतवाल चंद्रभान बाविस्कर निलंबित
प्रतिनिधी-विनायक पाटील
चोपडा – तालुक्यातील चौगांव येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून सेवेत असलेले चंद्रभान रतिलाल बाविस्कर यांनी चौगाव येथील तलाठी यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचेकडे कोतवाल चंद्रभान रतिलाल बाविस्कर यांचा मुलगा सचिन चंद्रभान कोळी ई-पीक पाहणी अॅपद्वारे ई-पीक पाहणी लावून देण्यासाठी शेतकरी खातेदार यांचेकडून दोनशे रुपयांची मागणी करत असले बाबतचा अहवाल कार्यालयात सादर केला. चंद्रभान रतिलाल बाविस्कर यांचा मुलगा सचिन चंद्रभान कोळी हा ई-पीक पाहणी लावून देण्यासाठी रुपये 200/- मागणी करत असलेला एक ऑडीओ रेकार्डींग त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाला असून पैश्यांच्या मागणीबाबत तलाठी यांनी स्वतः खात्री केली असून चंद्रभान रतिलाल बाविस्कर यांचा मुलगा सचिन कोळी हा बेकायदेशीरपणे पैश्यांची मागणी करत असलेबाबत अहवालात नमूद केले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये लोकसेवकाने त्याच्या पगारा व्यतिरिक्त आवश्यक कार्य पार पाडण्यासाठी लोकसेवकाने कायदेशीर वेतन फी किंवा मानधना शिवाय स्वतः किंवा पक्षकारामार्फत आणि इतरांसाठी लाच घेतल्यास किंवा मागणी केल्यास सहा महिने ते 5 वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंड होईल.त्याअर्थी चंद्रभान रतिलाल बाविस्कर, कोतवाल चौगाव यांनी ई-पीक पाहणीच्या कामात टाळाटाळ व अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. यावरुन चंद्रभान रतिलाल बाविस्कर हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत नाही. चंद्रभान रतिलाल बाविस्कर यांनी कोतवाल भरती व सेवा नियम 1959 मधील कर्तव्याचे पालन करण्यात कसूर केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. त्यांचे वर्तणूकीमूळे महसूल विभागाची व पर्यायाने महाराष्ट्र शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणून तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी आदेशान्वये चंद्रभान रतिलाल बाविस्कर यांस पुढील आदेश होई पावेतो निलंबित केले आहे. चंद्रभान रतिलाल बाविस्कर, कोतवाल चौगाव यांना निलंबन कालावधीत कोणतेही मानधन देण्यात येणार नाही. तसेच त्यांच्या सेवापटात लाल शाईने या आदेशाची नोंद घेण्यात आली आहे.