पिवळे केशरी रेशन कार्ड असेल तर ही लाडकी बहिण मिळणार लाभ
बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी अहमदपूर लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने अनेक नियम व अटी शिथिल केले असल्यामुळे बहुसंख्य महिलांना याचा लाभ होणार आहे तसेच कार्यालयाने फेऱ्याही माराव्या लागणार नाही सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाने माजी लाडकी बहीण आहे योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून या योजनेच्या पात्रतेसाठी अनेक अटी घालण्यात आल्या होत्या मात्र शासनाच्या नवीन नियमानुसार सदर अटी शिथिल करण्यात आले आहेत शिथिल करण्यात आलेल्या अटी महिलांना अधिवासाच्या प्रमाणपत्र ऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे राशन कार्ड अथवा मतदान ओळखपत्र जन्म दाखला अथवा शाळेची टीसी ही चालणार आहे अडीच लाख रुपये च्या उत्पन्नाच्या मर्यादेची अटही शिथिल करण्यात आले असून ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्या महिला यासाठी पात्र होणार आहेत त्यामुळे उत्पन्नाचा दाखला काढण्याची किंवा त्यासाठी खर्च करण्याची गरज नाही ज्या महिलांच्या नावाने पाच एकर पेक्षा कमी शेती आहे अशा महिलाही यासाठी पात्र ठरणार आहेत ज्या महिला पर राज्यात जन्मलेल्या आहेत मात्र त्यांचे लग्न महाराष्ट्रात झाले आहेत अशा सर्व महिला पात्र असून त्यासाठी त्यांना आपल्या पतीचा जन्मदाखला अथवा शाळेत सोडण्याचे प्रमाणपत्र अथवा महाराष्ट्र आधीवासींचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष वाढून 21 ते 65 वर्ष करण्यात आली आहे या योजनेत एका घरातील एक विवाहित महिलांना सुद्धा लाभ देण्यात येणार आहे यासंबंधीचे अर्ज सेतू सुविधा केंद्र आता ऑनलाईन सेंटरवर जाऊन भरावयाच्या असून काही दिवसात ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज भरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान तहसीलदार शिवाजी पालेपाड यांनी केले आहे. ********——गाव स्तरावरून लाभ सर्व कागदपत्रे गाव स्तरावर जमा करून तेथील अंगणवाडी सेविका अथवा जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी नेमलेल्या अधिकृत व्यक्तींकडे ऑनलाइन फॉर्म जमा करावे लागणार असून त्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरात येऊ नये व त्याची आवश्यकताही नाही ग्रामस्थरावरूनच सर्व प्रक्रिया केली जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी सौ मंजुषा लटपटे यांनी सांगितले