पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवी जळगाव येथे ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

जळगाव : येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधील पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवी जळगाव येथे काल जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न झाला. देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या अंतर्गत नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती म्हणजे पराक्रम दिन या निमित्ताने तसेच ऑपरेशन सिंदूर या थीमवर संबंधित प्रश्नमंजुषा स्पर्धा केंद्रशासनाच्या मार्फत घेण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील सीबीएससी पॅटर्न असलेल्या शाळांचा सहभाग होता. या स्पर्धेत एकूण 120 च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत विद्यार्थी व त्यांच्यासोबत आलेले सर्व शिक्षक यांना योग्य तो सन्मान तसेच चहा नाश्ता, जेवण व प्रमाणपत्र केंद्रीय विद्यालयामार्फत देण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य श्री सोना कुमार सर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी परीक्षा पे चर्चा पराक्रम दिवस आणि ऑपरेशन सिंदूर बद्दल विद्यार्थ्यांना संबोधित केले. सदर कार्यक्रमाचे कॉर्डिनेटर श्री नितीन आरसे सर होते. तसेच कार्यक्रमाचे संचालन श्री गणेश वाघमारे आणि श्रीमती प्रीती सोज्वळ यांनी केले.


