प्रवक्ता अकॅडमीच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न

धरणगाव / प्रवक्ता अकॅडमी ही प्रवक्ता ब्राईट माईंड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची संस्था आहे. प्रवक्ता अकॅडमी AI द्वारा इंग्लिश स्पीकिंग शिकवणारी भारतातील नामवंत संस्था आहे.या संस्थेचा 10 पुस्तकांचा वर्ड क्लास असा सिलॅबस तयार केला आहे.आणि त्या सिल्याबस चे आज रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार भाऊसो. गुलाबराव पाटील तसेच चोपड्याचे आमदार चंदू अण्णा तसेच विष्णू भंगाळे साहेब तसेच प्रवक्ता अकॅडमीचे फाउंडर प्रोफेसर रवींद्र पाटील तसेच प्रवक्ता अकॅडमी धरणगाव चे संचालक शशिकांत महाजन सर तसेच एरंडोल प्रवक्ता अकॅडमी संचालक विजय पाटील सर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भाऊंच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा व धरणगाव शितल अकॅडमी चा प्रवक्ता अकॅडमी मध्ये नामांतर सोहळा ही संपन्न झाला. आजच्या २१ व्या शतकामध्ये इंग्लिश बोलणे किती गरजेचे आहे व ती इंग्लिश फक्त भारतापुरती नव्हे तर भारताच्या बाहेर ब्रिटन, अमेरिकन यासारख्या एक्सेंट मध्ये इंग्लिश शिकणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि प्रवक्ता अकॅडमी ने ह्याच युक्तीला साध्य करत, AI द्वारा काही ॲप्स लॉंच केले व 10 पुस्तकांचा वर्ड क्लास सिलॅबस बनवला जो आजच्या युगात कृतीयुक्त शिक्षण देईल .प्रवक्ता अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांना फक्त पुस्त कातून वाचन करून नाही तर कृतीयुक्त शिक्षण दिले जाते. म्हणजे जो टॉपिक शिकवायचा असेल तो टॉपिक्स विद्यार्थ्यांना इन्व्हॉल करून शिकवला जातो. त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या मदतीने दाखविले जाते. त्या साह्याने विद्यार्थी ग्रामर कधी शिकतो हे त्याला कळत सुद्धा नाही व तो स्पिकिंग सेक्शन मध्ये आपली स्टेजरींग वाढवितो व AI लॅब मध्ये तो अनेक भाषा चांगल्या पद्धतीने AI द्वारा शिकतो अशा पद्धतीने प्रवक्ता अकॅडमी पूर्ण भारतभर काम करणार आहे अशी माहिती प्रवक्ता अकॅडमी भारत व नेपाळ यांचे फाउंडर रवींद्र पाटील सर यांनी दिली