ताज्या बातम्या
बांभोरी शिवरातून कपाशी झाडे चोरल्याने शेतकरी हैराण ; अज्ञात व्यक्ती विरोधात धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

धरणगाव प्रतिनिधी विनोद रोकडे
धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवरातून कापसाची झाडे अज्ञात चोरट्यांनी तोडून प्रगतिशील शेतकरी छोटू जाधव यांच्या शेतातील कापसाचे झाडे सुमारे 90 ते 100 झाडे तोंडून फेकले होते. तर बाकीचे झाडे घेऊन गेले. या चोरी मुळे शेतकरी चिंताग्रस्त असून पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. तरी पोलीस प्रशासनाने चोरी करणाऱ्या शोध घेण्याची मागणी शेतकरी छोटू जाधव यांनी केले आहे.