धरणगाव शहर
बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाचे बारा वर्षांमधील सर्वच मुलांचे पूर्ण झाले कोरोना लसीकरण
धरणगाव – येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयातील बारा वर्ष असलेले तसेच विद्यालयातील बारा वर्षावरील सर्वच विद्यार्थ्यांना कोरोना लस चे दोन्ही डोस आज रोजी देण्यात आलेत .ज्यात इयत्ता सातवी ते दहावीचे सर्व मुला मुलींचे लसीकरण माननीय मुख्याध्यापक श्री जीवन पाटील सर व एस एस पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण झाले. धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे लसीकरण विभागाचे पूर्ण टीम ज्यात प्रामुख्याने डॉक्टर मयूर जैन, विसपुते सिस्टर, यश बहारे, रियाज देशमुख, श्रीमती भदाणे सिस्टर, सौ बोरकर सिस्टर व स्टाफचे चांगले सहकार्य लाभले. माननीय दोघही मुख्याध्यापकांनी डॉक्टर मयुर जैन व त्यांच्या पूर्ण टीमचे आभार मानले. सदर लसीकरणासाठी श्री कैलास माळी सर, श्री किरण चव्हाण सर, शिक्षक व शिक्षिकांनी प्रयत्न केले. सदर उपक्रमाबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले.