बालकवी व सारजाई कुडे विद्यालयात गीत गायन स्पर्धा संपन्न

धरणगांव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव -येथील बालकवी ठोंबरे व सारजाई दामोदर कुडे विद्यालयात शालेय स्तरावरील गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पहिली ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.चार गटात स्पर्धा संपन्न झाली.स्पर्धेसाठी मुख्याध्यापक श्री व्ही बी पाटील ,मुख्याध्यापक श्री एस एस पाटील उपस्थित होते.
परीक्षक म्हणून सकाळ सत्रात वर्षा पाटील,डी एन चौधरी,आर एम चौधरी,महेंद्र परदेशी पल्लवी मोरे, सविता पाटील दुपारच्या सत्रात ए एच पाटील,जे एम पाटील,रजनीराणी पवार,जयश्री बोरसे,किरण पाटील,एन पी वाणी,व्ही एल मोरे,सागर पाटील,प्रियंका पाटील यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे गीत गायन केले या स्पर्धेसाठी स्पर्धा समिती प्रमुख सकाळ सत्र सचिन देसले सर तसेच दुपारच्या सत्रात सागर पाटील सर व सदस्य यांनी परिश्रम घेतले स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्वांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले